शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आग लागल्याने बाजारपेठेत गोंधळ : सीताबर्डीत खरेदीच्या उत्साहातआगीचा भडका

By मंगेश व्यवहारे | Updated: November 5, 2023 20:35 IST

१० फायर टेंडरद्वारे आगीवर नियंत्रण

नागपूर: दिवाळी पूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने सीताबर्डीच्या मेन रोडवर खरेदीसाठी नागपूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास खरेदीची लगबग सुरू असतानाच मेन रोडवरील संगम पतंग नावाची बिल्डींगमधील गारमेंट व जनरल स्टोअर्सला आग लागली. आगीचा भडका उडताच खरेदीसाठी आलेल्या नागपूरकरांची पळापळ सुरू झाली. अवघ्या काही मिनिटातच अग्निशमनला कॉल आला. गर्दीची दाटी काढत अग्निशमनचे पथक घटनास्थळी पोहचले. आगीची गंभीरता लक्षात घेता ९ फायर स्टेशनवरून १० फायर टेंडर तासाभरातच पोहचले. तरीही ५ तास आगीवर नियंत्रण करण्यास लागले.

संगम पतंग नावाने असलेली ही चार माळ्याची इमारत आहे. या इमारतीच्या तळ मजला व पहिल्या माळ्यावर अजय गारमेंट व पद्मा जनरल स्टोअर्स आहे. या दुकानांमध्येचही लाग लागली. दुपारच्या सुमारास सीताबर्डी मेन रोडवर खरेदीसाठी भरपूर गर्दी होती. आगीचा भडका उडताच लोकांची पळापळ सुरू झाली. सीताबर्डी पोलीसांनी परिसर रिकामा केला. लगतच्या विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद केली. परिसरात गर्दी असल्याने अग्निशमन विभागाला आग विझविण्यास काहीसा त्रास झाला. आगीचे नेमके कारण व नुकसानीचा अंदाज बातमी लिहेपर्यंत कळू शकला नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी घटनास्थळावर मुख्य अग्निशमन अधिकारी भीमराव चंदनखेडे, तुषार बाराहाते, भगवान वाघ, सुनिल डोकरे, सुरेश आत्राम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कार्य केले.

 मुरली ॲग्रो लि. कंपनीच्या कार्यालयाला आग ईस्ट वर्धमाननगरात चार माळ्याच्या इमारतीत मुरली ॲग्रो. लि. कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाला सकाळच्या सुमारास आग लागल्याने कार्यालयातील संपूर्ण साहित्य आगीत जळून खाक झाले. अग्निशमन विभागाला कॉल आल्यानंतर लगेच लकडगंज अग्निशमन केंद्रातून गाड्या घटनास्थळी रवाना झाला. आगीची गंभीरता लक्षात घेता सक्करदरा, कळमना व सुगतनगर येथूनही फायर टेंडर घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन पथकाच्या प्रयत्नाने अडीच तासांत आग विझविण्यात आली. आगीचे नेमके कारण कळले नाही, पण अग्निशमन विभागाच्या पथकामुळे कंपनीच्या अडीच कोटींच्या साहित्याची बचत झाल्याची माहिती आहे. लकडगंज झोनचे अग्निशमन अधिकारी दिलीप चौहान यांच्या नेतृत्वात अशोक पोटभरे, रणदिवे व शिर्के यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर