नागपूर मनपा आयुक्तांच्या नियुक्तीबाबत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:49 IST2018-04-17T23:49:03+5:302018-04-17T23:49:18+5:30
राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या झाल्या आहेत. यात नागपूर महापालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. मुदगल यांच्या जागी नगरविकास प्रशासनाचे संचालक वीरेंद्र सिंग यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. परंतु शासनाने अद्याप याबाबतचे आदेश काढलेले नाही. त्यामुळे महापालिकेचे नवीन आयुक्त कोण याबाबत संभ्रम आहे.

नागपूर मनपा आयुक्तांच्या नियुक्तीबाबत संभ्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या झाल्या आहेत. यात नागपूर महापालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. मुदगल यांच्या जागी नगरविकास प्रशासनाचे संचालक वीरेंद्र सिंग यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. परंतु शासनाने अद्याप याबाबतचे आदेश काढलेले नाही. त्यामुळे महापालिकेचे नवीन आयुक्त कोण याबाबत संभ्रम आहे.
मुदगल यांच्या बदलीसोबतच महापालिके च्या नवीन आयुक्तांच्या बदलीचा आदेश जारी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु दुसऱ्या दिवशी मंगळवारी याबाबत शासनाकडून महापालिकेला आदेश प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे वीरेंद्र सिंग येणार की, दुसरे कुणी येणार अशी चर्चा होती. २६ एप्रिलला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची दुसरी यादी जाहीर होणार असल्याची माहिती आहे. यात नवीन आयुक्तांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे सोमवारी नवीन ठिकाणी रुजू होणार आहेत. त्यापूर्वी अश्विन मुदगल जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. नवीन आयुक्त रुजू होईपर्यंत मुदगल यांच्याकडेच आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार राहणार आहे. बदलीच्या दुसऱ्या यादीत नासुप्रचे सभापती व एनएमआरडीएचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याही बदलीचे आदेश निघणार असल्याची चर्चा आहे.