रमाई जयंती महोत्सवाची रविवारी सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:55 IST2021-02-05T04:55:39+5:302021-02-05T04:55:39+5:30
नागपूर : प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यागमूर्ती रमाई जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही ...

रमाई जयंती महोत्सवाची रविवारी सांगता
नागपूर : प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यागमूर्ती रमाई जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यागमूर्तीला नमन करण्यात आले. नुकतेच ३१ जानेवारी रोजी रमाई आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी २०० हून अधिक चिमुकल्यांनी यात सहभागी होऊन रमाईला वंदन केले. येत्या ७ फेब्रुवारी रोजी स्पर्धेतील बक्षीस वितरणासह विविध कार्यक्रमांनी या महोत्सवाची सांगता होत आहे. सम्राट अशोक क्रीडांगण, कुकडे ले-आउट येथे सायंकाळी ६ वाजता सांगता कार्यक्रम होईल. आंबेडकरी विचारवंत व साहित्यिक अॅड. वैशाली डोळस यांच्या व्याख्यानाचे यानिमित्त आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता लीना संदीप तामगाडगे, सरोज विकास गडपायले, पुष्पाताई बौद्ध, मुख्याधिकारी ऋचा धाबर्डे, एपीआय सुकेशनी लोखंडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याशिवाय रमाई यांच्या जीवनावरील स्वागतनृत्यासह त्यांच्या जीवन चरित्राचा उलगडा करणारे छायाचित्र प्रदर्शनही याठिकाणी लावण्यात येणार असल्याची माहिती अनिकेत कुत्तरमारे यांनी दिली. यावेळी नरेश वाहाने, शुभम दामले, शीतल गडलिंग, सिद्धार्थ बन्सोड, वैशाली घुटके आदी उपस्थित होते.