ध्येय गाठण्यासाठी एकाग्रता महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST2021-02-15T04:08:48+5:302021-02-15T04:08:48+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : मातीपासून मडके तयार करण्यासाठी त्याला याेग्य आकार देण्याकरिता संत गाेराेबा काका ज्या एकाग्रतेने माती ...

Concentration is important to achieve the goal | ध्येय गाठण्यासाठी एकाग्रता महत्त्वाची

ध्येय गाठण्यासाठी एकाग्रता महत्त्वाची

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : मातीपासून मडके तयार करण्यासाठी त्याला याेग्य आकार देण्याकरिता संत गाेराेबा काका ज्या एकाग्रतेने माती पायाने तुडवून तयार करीत असत, त्यांचे लक्ष्य याेग्य माती तयार व्हावी, साेबतच प्रत्येकाने आपले जीवन सार्थकी लावावे, असा संदेश त्यांनी आपल्या वागणुकीतून दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही आपले लक्ष्य, ध्येय गाठण्यासाठी एकाग्रता ठेवावी, असे मार्मिक विचार ज्येष्ठ शिक्षक संघपाल शंभरकर यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील घाेग्रा (गुगुलडाेह) येथे दाेनदिवसीय संत गाेराेबा काका पुण्यस्मृती साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप गरिबदास शनिचरे महाराज हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी पं. स. सभापती नंदलाल चाैलीवार, संघपाल शंभरकर, रामेश्वर उईके, किसना पाटील, श्यामकला मालधे यांची उपस्थिती हाेती. यावेळी नंदलाल चाैलीवार यांनी संत गाेराेबा काकांचा पुतळा बसविण्यासाठी मदत करण्याचे जाहीर केले. किसना पाटील, श्यामकला मालधे यांनी संत गाेराेबा काकांच्या कार्याचा आढावा घेत मार्गदर्शन केले.

सायंकाळी हभप चन्ने महाराज (गाेंदिया), हभप मेहर महाराज (आलेसूर) व हभप गरीबदास महाराज यांनी ग्रामगीता व आध्यात्मिक जीवनावर कीर्तनातून प्रबाेधन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर जिझाेते यांनी केले. सूत्रसंचालन नेहा शनिचरे हिने केले. कार्यक्रमाच्या आयाेजनासाठी शिवशंकर जिझाेते, रविशंकर जिझाेते, बळीराम साेनवाणे, राजेश जिझाेते, बाबू जिझाेते, हरिकिसन जिझाेते, अरुण साेनवाणे, चंद्रशेखर भटपाई, धर्मराज घाटे, मुरलीधर जिझाेते, गिरधर जिझाेते, घनश्याम जिझाेते, साहू कटंगे आदींसह गावकऱ्यांनी सहकार्य केले. शनिवारी (दि.१३) दिंडी व महाप्रसादाने महाेत्सवाची सांगता झाली.

Web Title: Concentration is important to achieve the goal