शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास व्हावा; मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 11:30 AM

भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास करून त्याला नवचेतना दिली पाहिजे. भगवद्गीतेत तर मनाची ‘पॅथालॉजी’च मांडली आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देभगवद्गीतेत मांडली आहे मनाची ‘पॅथालॉजी’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संस्कृतीत मनासंबंधी सखोल विचार झाला आहे. पाश्चात्य मानसशास्त्राच्या संशोधनाबाबत चर्चा होताना दिसते. मात्र आपल्या देशातील मानसशास्त्रात वेगळी दृष्टी होती. आपल्या परंपरेत मनाचा विचार वैज्ञानिक पद्धतीने झाला आहे. त्यामुळे भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास करून त्याला नवचेतना दिली पाहिजे. भगवद्गीतेत तर मनाची ‘पॅथालॉजी’च मांडली आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पल्लवी जोशी-गायकवाड लिखित ‘मन आणि आपण’ या पुस्तकाचे गुरुवारी विमोचन झाले. त्यावेळी ते बोलत होते.रामनगर येथील श्री शक्तिपीठ येथे आयोजित या कार्यक्रमाला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर, नचिकेत प्रकाशनचे अनिल सांबरे प्रामुख्याने उपस्थित होते. मनुष्याच्या बऱ्याच कृतींचा थेट मनाशी संबंध असतो. प्रत्येकाची वेगवेगळी वृत्ती असते व उपजत स्वभाव असतो. आपल्यासोबतचे चांगले मित्र नेहमी आरसा दाखवितात. मात्र मनात अहंकार असला की व्यक्ती मित्रांचेही ऐकत नाही. यातून ‘मी’पणा वाढतो व तो घातक ठरू शकतो, असे डॉ. मोहन भागवत म्हणाले.आयुष्यात वावरत असताना नमते नेमके कुणी घ्यावे, या मुद्यावरून अनेकदा वाद होतात. मीच का नमते घ्यावे, असा प्रश्न विचारला जातो आणि यातूनच ‘ब्रेकअप’ होताना दिसतात. अगोदर एकत्र कुटुंबपद्धती होती व त्यात एकमेकांशी जुळवून घेण्याची सवय लहानपणापासूनच होती.मात्र आताच्या व्यवस्थेत अहंकार योग्य वेळी आवरता कसा घ्यावा, याची सवयच राहिलेली नाही. यापासून सुटका हवी असेल तर आत्मियतेचा परीघ वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या देशाचा ‘हॅपीनेस इन्डेक्स’ सातत्याने घसरतो आहे. आपण वेगळ्याच तणावाखाली वावरतो आहे.दुसरीकडे पाश्चात्यांचे अनुकरण करण्याच्या नादात आपल्या संस्कृतीचा विसर पडतो आहे. अशास्थितीत मानसोपचार तज्ज्ञांनी समाजप्रबोधन करावे, असे डॉ. शेंबेकर यांनी सांगितले. यावेळी लेखिका डॉ. पल्लवी जोशी-गायकवाड यांनीदेखील मनोगत मांडले. शिल्पा नंदनपवार यांनी संचालन केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत