शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोड १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा : प्रवीण दटके यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:52 AM

शहरातील दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडचे अखेरचे पॅकेज वगळता इतर सर्व कामे १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्यात यावी. पूर्ण झालेल्या रस्त्यावरील लहानसहान कामे पूर्ण करून धूळ स्वच्छ करण्यात यावी. डिव्हायडरची रंगरंगोटी आणि अन्य कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश प्रस्तावित व अपूर्ण असलेल्या बी.ओ.टी, पी.पी.पी., केंद्र व राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना गती देण्याकरिता गठित करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष माजी महापौर प्रवीण दटके यांनी बुधवारी दिले.

ठळक मुद्देविविध प्रकल्पांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडचे अखेरचे पॅकेज वगळता इतर सर्व कामे १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्यात यावी. पूर्ण झालेल्या रस्त्यावरील लहानसहान कामे पूर्ण करून धूळ स्वच्छ करण्यात यावी. डिव्हायडरची रंगरंगोटी आणि अन्य कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश प्रस्तावित व अपूर्ण असलेल्या बी.ओ.टी, पी.पी.पी., केंद्र व राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना गती देण्याकरिता गठित करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष माजी महापौर प्रवीण दटके यांनी बुधवारी दिले.महापालिका मुख्यालयातील सभागृहात आयोजित समितीच्या बैठकीत ते बोलत होते. सत्तापक्ष नेते सदस्य संदीप जोशी, आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले, नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, नगररचना सहायक संचालक प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, मोती कुकरेजा, सतीश नेरळ, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) सुनील कांबळे उपस्थित होते.अजनी रेल्वे स्टेशन पूल आणि वर्धा रस्त्याला जोडणाऱ्या डी.पी. रस्त्याचे लोकार्पण २२ फेब्रुवारीला होत असल्याने उर्वरीत कामे तातडीने पूर्ण करा, मच्छिसाथ, तीन नल चौक, बुधवारी येथील मटन मार्केट प्रकल्पांचे लोकार्पण २२ फेब्रुवारीला होत आहे.त्यादृष्टीने तयारी करण्याचे निर्देश दटके यांनी दिले. नागनदी प्रकल्पासाठी जिकाने अर्थसाहाय्य देण्यासाठी मान्यता दिली आहे. त्याबाबतचा सुधारित प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येईल, अशी माहिती तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. इसराईल यांनी दिली. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे नियोजन करा. नाईक तलाव, सोनेगाव तलाव, गांधीसागरचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला.शहरातील कचऱ्याची उचल करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या निविदांमध्ये अनुभवी आरोग्य निरीक्षकांची मते घेण्यात यावीत. त्यांच्या अनुभवाच्या आधारे स्कोप ऑफ वर्कमध्ये आवश्यक ते फेरबदल करण्यात यावे. निविदेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा, शहरात एलईडी लाईट लावण्याचे काम मे २०१९ पर्यंत पूर्ण करा, त्यानुसार महिनानिहाय अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. स्मार्ट सिटी प्रकल्पातील काही प्रश्नांबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली आणि आवश्यक ते निर्देश दिले. बैठकीला सर्व झोनचे सहायक आयुक्त, आरोग्य निरीक्षक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.कार्यवाही अहवाल सादर करासिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट, घनकचरा व्यवस्थापन, महाल बुधवार बाजार, सक्करदरा बुधवार बाजार, कमाल टॉकीज जवळील बाजार, महाल येथील मासोळी बाजार, केळीबाग रोड, गड्डीगोदाम येथील रस्ता, पारडी येथील रस्त्यासंदर्भातील कार्यवाहीची सद्यस्थिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. पुढील बैठकीत याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रवीण दटके यांनी यावेळी दिले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर