विभागातील विकास कामे तातडीने पूर्ण करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:09 IST2021-01-19T04:09:07+5:302021-01-19T04:09:07+5:30
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सुरू असलेली विकास कामे ठराविक कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश दक्षिण पूर्व ...

विभागातील विकास कामे तातडीने पूर्ण करा ()
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सुरू असलेली विकास कामे ठराविक कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गौतम बॅनर्जी यांनी अधिकाऱ्यांना दिले.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकार क्षेत्रातील नागपूर विभागात अनेक प्रकल्पांवर कार्य करण्यात येत आहे. ही कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी या कामांची समीक्षा करून त्यातील अडथळे दूर करणे गरजेचे असते. त्यासाठी दपूम रेल्वेच्या नागपूर विभागातील सभागृहात महाव्यवस्थापक गौतम बॅनर्जी यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर उप्पल आणि अधिकाऱ्यांसोबत समीक्षा बैठक घेतली. बैठकीत ‘डीआरएम’ मनिंदर उप्पल यांनी महाव्यवस्थापकांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून नागपूर विभागातील उपलब्धी आणि इतर माहिती दिली. बैठकीत विभागात सुरू असलेली ब्रॉडगेजची कामे, विकास कामे, पार्सल-माल वाहतूक वाढविण्यासाठी धोरण, प्रवासी सुविधा, रेल्वे रुळांची देखभाल, सुरक्षा आदींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाव्यवस्थापकांनी छिंदवाडा-नैनपूर, मंडला-नैनपूर सेक्शनमध्ये सुरू असलेल्या ब्रॉडगेजच्या तसेच विद्युतीकरणाच्या प्रगतीसंबंधी माहिती जाणून घेतली. तसेच ही कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महाव्यवस्थापकांनी मोतीबाग येथील रेल्वे म्युझियमला भेट देऊन ऐतिहासिक वस्तूची पाहणी केली.