लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोतीबाग येथील रेल्वेच्या वर्कशॉपला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अजय विजयवर्गीय यांनी भेट दिली. त्यांनी बॅक्टेरीया आणि बायो टँक प्लँटची पाहणी करून बायो टॉयलेटची मागणी पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.महाव्यवस्थापक अजय विजयवर्गीय यांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील मोतीबाग वर्कशॉपला भेट देऊन तेथील योजनांची माहिती जाणून घेतली. मोतीबाग येथील बायो टॉयलेट प्लँटला भेट दिली. प्लँटमध्ये सुरु असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक करून बायो टॉयलेटचे दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागपूर विभागात सुरू असलेल्या ब्रॉडगेज योजनांबाबत त्यांनी माहिती घेऊन या योजना वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले. विभागात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक वाय. एच. राठोड, बी. के. रथ यांच्यासह विभागातील शाखा अधिकारी उपस्थित होते.
बायो टॉयलेटची मागणी पूर्ण करा : अजय विजयवर्गीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:57 IST
मोतीबाग येथील रेल्वेच्या वर्कशॉपला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अजय विजयवर्गीय यांनी भेट दिली. त्यांनी बॅक्टेरीया आणि बायो टँक प्लँटची पाहणी करून बायो टॉयलेटची मागणी पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
बायो टॉयलेटची मागणी पूर्ण करा : अजय विजयवर्गीय
ठळक मुद्देमोतीबाग वर्कशॉपची केली पाहणी