शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
5
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
6
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
7
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
8
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
9
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
10
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
11
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
12
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
13
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
14
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
15
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
16
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
17
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
18
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
19
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
20
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

आमदार निवासातील संशयितांची तक्रार : एकाच माळ्यावर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 9:07 PM

आमदार निवासाच्या इमारत क्रमांक २ मधील चौथ्या माळ्यावर रविवारचा दिवस पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्ण एकाच माळ्यावर होते. धक्कादायक म्हणजे, पॉझिटिव्ह रुग्णांची वऱ्हांड्यात ये-जा सुरू होती.

ठळक मुद्देनिगेटिव्ह रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आमदार निवासाच्या इमारत क्रमांक २ मधील चौथ्या माळ्यावर रविवारचा दिवस पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्ण एकाच माळ्यावर होते. धक्कादायक म्हणजे, पॉझिटिव्ह रुग्णांची वऱ्हांड्यात ये-जा सुरू होती. त्यांच्या कक्षात इतरांचे येणे-जाणे सुरू होते. त्यामुळे चाचणी निगेटिव्ह आलेल्या संशयितांच्या मनात भीतीचे वातावरण होते, अशी माहिती एका संशयिताने ‘लोकमत’ला फोनवरून दिली. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी संबंधित अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या एम्प्रेस सिटी येथील एका रहिवाशाचे नमुने ३० मार्च रोजी पॉॅॅझिटिव्ह आले. एम्प्रेस सिटीसह शेजारच्या इस्कॉन टेम्पलमधील १५ पुरुषांना नमुने तपासून सहा तासात सोडले जाईल, असे सांगून महापालिकेच्या चमूने आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षातील इमारत क्रमांक २ मध्ये दाखल केले. येथे आल्यावर त्यांना १४ दिवस थांबावे लागेल असे सांगण्यात आले. आपल्यामुळे आजार पसरू नये म्हणून या लोकांनी सहकार्य केले. यातील काही लोकांना याच इमारतीच्या चवथ्या मजल्यावरील कक्षात ठेवले. सर्वांची दोन वेळा नमुन्यांची तपासणी होऊन अहवाल निगेटिव्हही आला. रविवारी १४ दिवस पूर्ण झाल्याने घरी सोडण्यात येणार होते. परंतु चवथ्या माळ्यावरील कक्ष क्रमांक ४४६ व ४४९ कक्षातील चौघे पॉझिटिव्ह आले. यामुळे निगेटिव्ह चाचणी आलेल्यांना थांबवून ठेवण्यात आले. सकाळी पॉझिटिव्ह आलेले रुग्ण चहापाण्यासाठी वऱ्हांड्यात फिरत होते. रात्री महापालिकेची चमू येऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले. या दरम्यान निगेटिव्ह आलेल्यांना संसर्गाचा धोका वाढला होता.मनपामध्ये नियोजनाचा अभावसंशयित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. परंतु ज्यांचे नमुनेच तपासले गेले नाहीत त्यांना आणि ज्यांचे नमुने निगेटिव्ह आले त्यांना एकाच इमारतीत एकाच माळ्यावर ठेवले जात आहे. येथील क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या लोकांच्या मते, निगेटिव्ह लोकांना व संशयितांना किमान वेगवेगळ्या माळ्यावर किंवा वेगळ्या इमारतीत ठेवायला हवे. पॉझिटिव्ह आलेल्यांना तातडीने रुग्णालयात हलवायला हवे. परंतु यात होत असलेला उशीर व मनपामध्ये नियोजन नसल्याने संसर्ग वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMLA Hostelआमदार निवासnagpurनागपूर