शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

उपराजधानीतील बँकांविरोधात तक्रारी वाढल्या; माहितीच्या अधिकारात झाले उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:39 PM

२०१७ पासून १४ महिन्यांतच या एकाच वर्षात बँकांच्या कार्यप्रणालीवर नाराज असलेल्या देशभरातील नागरिकांनी ‘रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया’कडे थोड्याथोडक्या नव्हे तर एक लाखाहून अधिक तक्रारी केल्या आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे१४ महिन्यांत दीड लाखांहून अधिक तक्रारी सेवांमधील त्रुटीसाठी ‘आरबीआय’ लोकपालाकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बँकांच्या सेवांमध्ये काही त्रुटी असतील तर सामान्य नागरिक तक्रारी वगैरे करण्याच्या फंदात पडत नाही असा सर्वसाधारण समज आहे. परंतु २०१७ पासून १४ महिन्यांतच या एकाच वर्षात बँकांच्या कार्यप्रणालीवर नाराज असलेल्या देशभरातील नागरिकांनी ‘रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया’कडे थोड्याथोडक्या नव्हे तर एक लाखाहून अधिक तक्रारी केल्या आहेत. २०१६ च्या तुलनेत तक्रारींमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे हे विशेष. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी बँकांच्या कार्यप्रणाली व सेवेवर नाराज असलेल्या किती नागरिकांनी रिझर्व्ह बँकेकडे दाद मागितली, कुठल्या बँकेविरोधात सर्वात जास्त तक्रारी आहे, यासंदर्भात माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत विविध बँकांविरोधात बँक लोकपाल कार्यालयात १ लाख ७३ हजार १७० तक्रारी प्राप्त झाल्या. यात देशातील विविध राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका तसेच सहकारी बँकांचा समावेश आहे. देशभरातील २०३ बँकाविरोधात या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

१ ते २६ हजार तक्रारींचा समावेशमाहितीच्या अधिकारात मिळालेल्या या माहितीनुसार, बँकांवर नाराज असलेल्या ग्राहकांनी सर्वच प्रकारच्या बँकांविरोधात ‘रिझर्व्ह बँकेच्या लोकपाल’कडे तक्रारी केल्या आहेत. यात अगदी एक तक्रार असलेली बँक आहे अन् २५ हजारांहून अधिक तक्रार असलेल्या बँकेचादेखील समावेश आहे. १००० किंवा त्याहून कमी तक्रारी असलेल्या १७५ बँक, १ हजार ते ५ हजार तक्रारी असलेल्या १८ तर ५ हजारांहून अधिक तक्रारी असलेल्या १० बँकांचा या यादीत समावेश आहे.

नागपुरातील दोन बँकांचा समावेशदरम्यान, या तक्रारीच्या यादींमध्ये नागपुरातील दोन बँकांचादेखील समावेश आहे. सहकारी बँक गटातील या बँकांविरोधात ‘रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया’कडे अनुक्रमे ५ व ८ तक्रारी झालेल्या आहेत.

‘केवायसी’ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर कारवाई नाही१४ महिन्यांच्या कालावधीत ‘रिझर्व्ह बँके’ला ‘केवायसी’ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४ राज्य सहकारी व ३४ जिल्हा सहकारी बँका आढळून आल्या. परंतु या बँकांवर कुठलीही दंडात्मक कारवाई झालेली नाही.

राज्य सहकारी बँकांचे ‘एनपीए’ नऊ लाख कोटींजवळदरम्यान, ३१ डिसेंबर २०१७ च्या आकडेवारीनुसार राज्य सहकारी बँकांचा ‘एनपीए’चा आकडा ८,९९,६५९ कोटी इतका होता. तर सर्व अर्बन सहकारी बँकांचा ‘एनपीए’ची आकडेवारी २१,२९७ कोटी ८३ लाख इतकी होती.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्र