कवाडे यांच्याविरुध्द जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:41 IST2019-04-03T00:36:39+5:302019-04-03T00:41:14+5:30

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जयदीप कवाडे यांनी काँग्रेसच्या जाहीर सभेत भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरुद्ध त्यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

Complaint against Kawade to District Election Officer | कवाडे यांच्याविरुध्द जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

कवाडे यांच्याविरुध्द जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

ठळक मुद्देस्मृती इराणी यांच्या विरुद्ध केले आक्षेपार्ह वक्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जयदीप कवाडे यांनी काँग्रेसच्या जाहीर सभेत भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरुद्ध त्यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
राहुल खंगार, योगेश पाचपोर, बाल्या रारोकर, सुनिता पाटील, रोहित जामडे, वरुण गजभिये यांनी ही तक्रार केली आहे. जयदीप कवाडे यांनी स्मृती इराणी संदर्भात वक्तव्य करून संपूर्ण महिला वर्गाचा अपमान केला आहे. एकप्रकारे त्यांनी इराणी यांचा विनयभंग केला आहे. यावेळी उपस्थित काँग्रेस नेते हसत होते. तेव्हा महिलांबद्दल ते किती संवेदनशील आहेत हे दिसून येते. यावेळी उपस्थित काँग्रेसचे उमेदवार आणि इतर नेत्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. तेव्हा त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सुद्धा केली आहे.

 

 

Web Title: Complaint against Kawade to District Election Officer