यूपीच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध नागपूरच्या सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:56 IST2018-11-30T00:56:01+5:302018-11-30T00:56:45+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आपत्तीजनक वक्तव्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते गुरुवारी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचले.

यूपीच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध नागपूरच्या सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आपत्तीजनक वक्तव्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते गुरुवारी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचले.
कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी अल्वर जिल्ह्यातील निवडणूक प्रचार सभेत चुकीचे वक्तव्य केले. परिषदेचे नागपूर जिल्हा प्रमुख राजेश शुक्ला, दलाचे महानगर प्रमुख विक्की पांडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने ठाणेदार हेमंत खराबे यांची भेट घेतली. चुकीच्या वक्तव्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडल्याचा हवाला देत मुख्यमंत्री योगींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात निखिल अग्निहोत्री, राम नंदनवार, राहुल संगवार, सूरज दुबे, राजेश वर्मा, सतीश बहादूर, अजय ठाकरे आदी उपस्थित होते.