शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कंत्राटदारांत स्पर्धा! यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बिलो निविदांचा पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 12:22 IST

५० टक्के कमी दराने निविदा : कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

कमल शर्मा

नागपूर : ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी मंगळवारपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने १०० पैकी ९३ निविदा उघडल्या आहेत. कार्यादेश देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. महिनाभरात काम पूर्ण करण्याचे कंत्राटदारापुढे आव्हान आहे. मात्र, निविदा काढण्याचा दर व कंत्राटदारांच्या निविदातील दर बघता गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यंदा बिलो निविदांचा पेच काहीसा वाढला आहे. दुसरीकडे कंत्राटदार म्हणतात, स्पर्धा वाढल्याने असा प्रकार घडला आहे.

निविदातील आकडेवारी पाहिल्यावर धक्कादायक आकडेवारी समोर येते. रंगरंगोटीची कामे जवळपास निम्म्या दराने देण्यात आली आहेत. पीडब्ल्यूडीचेच म्हणणे आहे की, सरासरी ४० ते ४५ टक्के कमी दराने निविदा काढण्यात आल्या आहेत. गतवर्षीही सुमारे ३५ टक्के कमी दराने काम झाले होते.

शासकीय पॉलिटेक्निक ऑडिट करणार

कामांच्या दर्जावर बारकाईने लक्ष ठेवले जाईल, असा दावा बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे. अधीक्षक अभियंता यांनी स्थापन केलेल्या समितीकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच बिले मंजूर होतील. यासोबतच शासकीय पॉलिटेक्निकच्या माध्यमातून थर्ड पार्टी ऑडिटही करण्यात येणार आहे.

स्पष्ट धोरण नाही

  • जास्त रकमेच्या निविदा उघडण्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट आहे. दर पाच टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास निविदेच्या रकमेनुसार निर्णय घेण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना आहे. मात्र बिलात असे काहीही नाही. नागपूर कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष सुबोध सरोदे म्हणाले की, याबाबत सरकारने स्पष्ट धोरण आखावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सरासरी बिलाचे सूत्र निश्चित केले पाहिजे. बिलाचे काम होत असल्यास एका ठेकेदाराला तीनपेक्षा जास्त कामे देऊ नयेत.
  • रविभवनमधील पेंटिंगसाठी प्रत्येकी १० लाख रुपये. १० निविदा काढण्यात आल्या. मात्र या कामाचे वाटप ५ ते ६ लाखात करण्यात आले.
  • आमदार निवासातील बाथरूमच्या फरशा बदलाव्या लागणार आहेत. यासाठी २०-२० लाख रुपयांच्या. सुमारे २० निविदा काढण्यात आल्या. या निविदा ४८ टक्के कमी दराने उघडण्यात आल्या.
  • विधानभवनातील बॅरेकच्या दुरुस्तीच्या कामासाठी १५ ते २० लाख रुपयांच्या २० निविदा काढण्यात आल्या. ४७ टक्के कमी दरावर कामाचे वाटप करण्यात आले.
टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनGovernmentसरकार