शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दुकानांची नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : सावनेर-गाेंडखैरी या दाेन राष्ट्रीय महामार्गाला जाेडणाऱ्या महामार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात धापेवाडा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : सावनेर-गाेंडखैरी या दाेन राष्ट्रीय महामार्गाला जाेडणाऱ्या महामार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात धापेवाडा (ता. कळमेश्वर) येथील बसस्थानक परिसरातील काही दुकानदारांची दुकाने ताेडण्यात आली. त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन प्रशासनाच्यावतीने देण्यात आले हाेते. मात्र, अद्यापही देण्यात आली नाही. त्यामुळे या नुकसानग्रस्तांनी तहसीलदार सचिन यादव यांच्याकडे निवेदन सादर करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

सावनेर-गाेंडखैरी हा मार्ग धापेवाडा येथून जात असून, येथील बसस्थानक परिसरात या मार्गालगत काहींनी त्यांची दुकाने थाटली हाेती. यात हाॅटेल, भाेजनालय, पिंजनालय, सायकल व माेटरसायकल दुरुस्ती, चहा व पानटपरी, फुलं व हार आदी दुकानांचा समावेश असून, ही दुकाने ३० वर्षांपासून असल्याने प्रत्येकाने त्या दुकानांच्या इमारतीचे पक्के बांधकाम केले हाेते. सर्वे क्रमांक ५१०, ५११ व ५४१ मध्ये असलेल्या या दुकानांवर दुकानदारांचा उदरनिर्वाह चालायचा तसेच दुकानदार ग्रामपंचायत प्रशासनाला नियमित मालमत्ता व दिवाबत्ती करही द्यायचे.

सावनेर-गाेंडखैरी महामार्गाच्या चाैपदरीकरणासाठी ही दुकाने अतिक्रमित ठरवण्यात आली. प्रशासनाने दुकानांच्या जागेचे माेजमाप करून दुकानदारांना त्या जागेचा आर्थिक माेबदला देण्यात येणार असल्याचे सांगितले आणि नंतर ती दुकाने जमीनदाेस्त करण्यात आली. त्यामुळे त्या दुकानदारांच्या उपजीविकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एक वर्ष पूर्ण हाेऊनही प्रशासनाने आपल्याला नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे उपजीविका कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला असून, आपल्याला तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही दुकानदारांनी या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात विजय हिवरकर, फरजाना शेख, मनोहर ठाकरे, दिगांबर लोखंडे, प्रमोद गोतमारे, माणिक चौधरी, मेहमूद शेख शब्बीर फारुकी, नत्थू वानखेडे, शेख रफीक याकूब शेख यांच्यासह अन्य दुकानदारांचा समावेश हाेता.