लघु, मध्यमच्या तुलनेत मोठे सिंचन प्रकल्प भरलेले
By Admin | Updated: May 28, 2014 00:53 IST2014-05-28T00:53:47+5:302014-05-28T00:53:47+5:30
एरवी उन्हाळ्यात कोरडे पडणार्या मोठय़ा सिंचन प्रकल्पाची स्थिती यंदा मात्र समाधानकारक आहे. मोठय़ा प्रकल्पांच्या तुलनेत लघु आणि मध्यम प्रकल्पांत पाण्याची पातळी खाली घसरली असून,

लघु, मध्यमच्या तुलनेत मोठे सिंचन प्रकल्प भरलेले
नागपूर : एरवी उन्हाळ्यात कोरडे पडणार्या मोठय़ा सिंचन प्रकल्पाची स्थिती यंदा मात्र समाधानकारक आहे. मोठय़ा प्रकल्पांच्या तुलनेत लघु आणि मध्यम प्रकल्पांत पाण्याची पातळी खाली घसरली असून, या प्रकल्पात पाणीसाठा सरासरी २२ टक्के आहे. त्यातुलनेत मोठय़ा प्रकल्पात मे महिन्याच्या अखेरीस ४८ टक्के पाणीसाठा आहे. नागपूर विभागात एकूण १६ मोठे सिंचन प्रकल्प आहेत. त्यांची प्रकल्पीय क्षमता २८५६ द.ल.घ.मी. असून, सध्या त्यात १३७८ द.ल.घ.मी. म्हणजे एकूण साठय़ाच्या ४८ टक्के पाणी आहे. गेल्या आठवड्यात १४0१ द.ल.घ.मी. पाणी होते. या आठवड्यात २३ द.ल.घ.मी.ने ही पातळी कमी झाली. मात्र संपूर्ण राज्याचा विचार केला तर सर्वाधिक जलसाठा नागपूर विभागातील मोठय़ा प्रकल्पातच आहे. कोकणातील प्रकल्पात ३७ टक्के, मराठवाड्यातील प्रकल्पात ३७ टक्के, अमरावती विभागाच्या प्रकल्पात ४0 टक्के, नाशिक २१ टक्के आणि पुणे विभागातील प्रकल्पात १८ टक्के पाणी आहे. मोठय़ा प्रकल्पांच्या तुलनेत मध्यम आणि लघु प्रकल्पात कमी पाणी आहे. नागपूर विभागात ४0 मध्यम प्रकल्प असून, त्यात एकूण प्रकल्प क्षमतेच्या (५५१ द.ल.घ.मी.) २२ टक्के (१२१ द.ल.घ.मी.) जलसाठा आहे. मागील आठवड्यात या प्रकल्पात १२३ द.ल.घ.मी. पाणी होते. राज्यातील इतर विभागाचा विचार केला तर मध्यम प्रकल्पातील जलसाठय़ांमध्ये अमरावती विभागाची स्थिती चांगली आहे. या भागातील प्रकल्पात ३९ टक्के जलसाठा आहे. कोकणात २४ टक्के, मराठवाड्यात २१ टक्के, नाशिकमध्ये २९ टक्के तर पुणे विभागातील मध्यम सिंचन प्रकल्पात २२ टक्के पाणी आहे. नागपूर विभागात ३१0 लघु प्रकल्प असून, त्यात सध्या २२ टक्के पाणी आहे. (एकूण प्रकल्पीय क्षमता ४८३ द.ल.घ.मी., सध्याचा जलसाठा १0६ द.ल.घ.मी.) गेल्या आठवड्यात या प्रकल्पात ११0 द.ल.घ.मी. पाणीसाठा होता. एका आठवड्यात १ टक्क्याने त्यात घट झाली. यंदा मान्सून वेळेआधीच बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ही शक्यता खरी ठरली तर दिलासादायक चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)