उच्चरक्तदाबासह कोमॉर्बिडीटी कोरोनाबाधितांसाठी ठरले प्राणघातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST2021-06-18T04:07:08+5:302021-06-18T04:07:08+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाच्या दोन्ही लाटेत मृत्यूची धक्कादायक आकडेवारी समोर आली. ९०१३ रुग्णांचे जीव गेले. यात उच्च रक्तदाबासह ...

Comorbidity with hypertension proved fatal for coronary artery disease | उच्चरक्तदाबासह कोमॉर्बिडीटी कोरोनाबाधितांसाठी ठरले प्राणघातक

उच्चरक्तदाबासह कोमॉर्बिडीटी कोरोनाबाधितांसाठी ठरले प्राणघातक

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाच्या दोन्ही लाटेत मृत्यूची धक्कादायक आकडेवारी समोर आली. ९०१३ रुग्णांचे जीव गेले. यात उच्च रक्तदाबासह ‘कोमॉर्बिडिटीज’ प्राणघातक ठरले. एकट्या मेडिकलमध्ये मागील १२ महिन्यात अशा ५३.८६ टक्के रुग्णांचे मृत्यू झाले. यात ५० व त्यापुढील वयोगटातील रुग्णांची संख्या मोठी आहे. आता तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात असल्याने ‘कोमॉर्बिडिटीज’ असलेल्या रुग्णांनी यापुढे योग्य जीवनशैली आत्मसात करणे गरजेचे झाले आहे.

मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यकृत व मूत्रपिंडाचे विकार असलेल्यांना ‘कोमॉर्बिडिटीज’ म्हटले जाते. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूमागे ‘कोमॉर्बिडिटीज’ सर्वात महत्त्वाचे कारण ठरले. भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी असून जवळपास आठ कोटी लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत तर उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. या रुग्णांच्या शरीरात प्रतिकारशक्ती कमी असल्याने कोरोनाचा विचार करून या रुग्णांनी आहारविहार व पथ्यपाण्याची विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

-मधुमेह असलेल्या ८.२६ टक्के रुग्णांचा मृत्यू

मेडिकलमध्ये १ मे २०२० ते १६ जून २०२१ या कालावधीत ४०७४ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले. यातील ६७९ रुग्णांचा रुग्णालयात येण्यापूर्वीच मृत्यू झाला. या शिवाय, वॉर्डात ३१५८, कॅज्युअल्टीमध्ये २३६ रुग्णांचे जीव गेले. यात मधुमेह असलेल्या १९७ (८.२६ टक्के), उच्च रक्तदाब असलेल्या १४७ (१८.३३ टक्के), मधुमेह व ‘कोमॉर्बिडिटीज’असलेल्या ८८५ (३७.१२ टक्के), उच्च रक्तदाब व ‘कोमॉर्बिडिटीज’असलेल्या १२८४ (५३.८६ टक्के) तर मूत्रपिंडाचा गंभीर आजार असलेल्या १६५ (६.९२ टक्के) , यकृताचा आजार असलेल्या १८ (०.७६) टक्के तर शारीरिक व मानसिकदृष्ट्या कमजोर असलेल्या १४५ (६.०८ टक्के) रुग्णांचा जीव गेला आहे.

-कोमॉर्बिडिटी असलेल्यांनी काळजी घेणे आवश्यक

मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, यकृत व मूत्रपिंडाचे विकार असलेल्या व वृद्धांच्या शरीरात प्रतिकारशक्ती कमी राहते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या विकाराच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यायला हवी. साखरेवर नियंत्रण, योग्य आहार व नियमित व्यायामाकडे लक्ष द्यायला हवे. आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संगीत किंवा अन्य कशातही स्वत: ला गुंतवून ठेवायला हवे. यामुळे ताणतणावावर मात करता येईल.

-डॉ. प्रशांत पाटील, प्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल

-कोरोनासह इतरही विकार असलेल्या मृत्यूची संख्या

कोमॉर्बिडिटीज: मृत्यू : टक्केवारी

मधुमेह: १९७ : ८.२६ टक्के

उच्च रक्तदाब : ४३७ : १८.३३ टक्के

मधुमेह व कोमॉर्बिडिटीज : ८८५ : ३७.१२ टक्के

उच्च रक्तदाब व कोमॉर्बिडिटीज: १२८४ : ५३.८६ टक्के

मूत्रपिंडाचा आजार : १६५ : ६.९२ टक्के

शारीरिक व मानसिक आजार : १४५ : ६.०८ टक्के

-५० ते ६० वयोगटात सर्वाधिक मृत्यू

वय : मृत्यू : टक्केवारी

० ते २० : ५७ : १.४० टक्के

२१ ते ३० : १७६ : ४.३३ टक्के

३१ ते ४० : ३७० : ९.१० टक्के

४१ ते ५० : ७१२ : १७.५१ टक्के

५१ ते ६० : ९९० : २४.३४ टक्के

६१ ते ७० : ९७१ : २३.८८ टक्के

७१ व पुढील : ७९१ : १९.४५ टक्के

-२४ तासात ८२० मृत्यू

वेळ : मृत्यू : टक्केवारी

ब्राट डेड : ६७९ : १६.६७ टक्के

२४ तास : ८२० : २०.१३ टक्के

१ ते ३ दिवस :९०५ : २२.२१ टक्के

३ ते ५ दिवस ५३२ : १३.०६ टक्के

५ व पुढील दिवस : ११३८ : २७.९३

Web Title: Comorbidity with hypertension proved fatal for coronary artery disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.