शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

अवैध सावकारांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:44 AM

राज्यातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी व अशा सावरकारांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी विधान परिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याची घोषणा सहकार मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.

ठळक मुद्देजयंत पाटील यांची विधान परिषदेत घोषणाविद्या चव्हाण समिती अध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी व अशा सावरकारांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी विधान परिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याची घोषणा सहकार मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.विद्या चव्हाण यांनी नियम ९३ अन्वये अवैध सावकारी संदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकाळ चर्चेच्या उत्तरात पाटील बोलत होते. ते म्हणाले, माजी मंत्री आर.आर. पाटील यांनी अवैध सावकारी विरोधात कायदा आणला. या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व निबंधकांना दिल्या आहेत. मात्र अवैध सावकारांविरुद्ध सहकार विभागातील उपनिबंधक कारवाई करण्यास टाळटाळ करत असल्याबाबतच्या गंभीर तक्रारी आहेत. अशा अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी तसेच अवैध सावकारी कायद्यात सुधारणा सुचविण्याचे काम ही समिती करणार आहे. मागील पाच वर्षात राज्यात अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात फोफावली. तीन महिन्यात यावर जरब बसविण्यासाठी सावकारी कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. या समितीत विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग, सुरेश धस, गिरीश व्यास आदींचा समावेश असेल तसेच सहकार व महसूल विभागातील अधिकारी दिले जातील, अशी माहिती पाटील यांनी दिली. अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी या समितीने सुचविलेल्या सूचनांचा समावेश कायद्यात करण्यात येईल. चर्चेत ख्वाजा बेग, सुरेश धस, गिरीश व्यास आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलVidhan Parishadविधान परिषद