शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

प्रादेशिक मनोरुग्णालयात राष्ट्रीय  महिला आयोगाची समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:07 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला समितीने प्रादेशिक मनोरुग्णालयाला अचानक भेट दिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. परंतु या अचानक भेटीतही रुग्णांच्या सोर्इंसाठी राबविणारे विविध उपक्रम, कार्यक्रम व खेळ पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे, रुग्णांनी फुलविलेली शेती व फळबाग पाहून रुग्णालय प्रशासनाचे विशेष कौतुक केले.राष्ट्रीय  महिला आयोगाचे आलोक रावत आणि अवनी ...

ठळक मुद्देविविध सोईसुविधांचे केले कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला समितीने प्रादेशिक मनोरुग्णालयाला अचानक भेट दिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. परंतु या अचानक भेटीतही रुग्णांच्या सोर्इंसाठी राबविणारे विविध उपक्रम, कार्यक्रम व खेळ पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे, रुग्णांनी फुलविलेली शेती व फळबाग पाहून रुग्णालय प्रशासनाचे विशेष कौतुक केले.राष्ट्रीय  महिला आयोगाचे आलोक रावत आणि अवनी बाहरी यांनी गुरुवारी रुग्णालयाची अचानक पाहणी केली. यावेळी रुग्णांसाठी करमणुकीसाठी सुरु असलेले ‘मुव्ही क्लब’, नृत्य, व्यायामाचे सत्र आणि विविध खेळांमध्ये रुग्ण व्यस्त असल्याचे पाहून आनंद व्यक्त केला. व्यवसायोपचाराच्या दृष्टिकोनातून रुग्णांनी साकारलेली विविध कलाकृतीचे त्यांनी निरीक्षण केले. रुग्णालयाच्या परिसरात सुमारे १० एकर परिसरात रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातून साकारलेली भाजीपाल्याची शेती व फळबाग पाहताना समितीच्या चमूने रुग्णालय प्रशासनाचे विशेष कौतुक केले. या शेतीतून रोज ६० ते ७० किलो भाजी काढली जात असल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. समितीने स्वयंपाकगृहाची पाहणी केली. रुग्ण लवकर बरे होण्याच्या दृष्टीने संगीतद्वारे उपचार सुरू करण्याचा आणि रुग्णालयातील पथदिव्यासाठी नव्या सोलर तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सूचनाही आलोक रावत यांनी दिल्या.रुग्णालयातील सर्व रुग्णांचे आधार कार्ड काढण्यात आले आहे. त्यांचे बँक खाते लवकरात लवकर उघडण्याचे अवनी बाहरी यांनी सुचविले. महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट्च्या ‘उडान’ या संयुक्त उपक्रमात सुरु असलेल्या कार्याची पाहणी समितीने करून समाधान व्यक्त केले. यावेळी प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूरचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन गुल्हाने, उपअधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे, मनोविकृती तज्ञ मधुमिता बहाले, टाटा ट्रस्ट्च्या डॉ. भारती बत्रा, अविनाश खरपकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयnagpurनागपूर