शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या बजेटला आयुक्तांची कात्री

By admin | Updated: January 28, 2016 02:57 IST

स्थानिक स्वराज्य संस्था (एलबीटी) रद्द झाल्याने महापालिकेला जबर आर्थिक फटका बसला आहे.

४९०.१४ कोटींचा कट : सुधारित बजेट १४७४.९८ कोटींचे नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था (एलबीटी) रद्द झाल्याने महापालिकेला जबर आर्थिक फटका बसला आहे. या मोबदल्यात शासनाकडून अपेक्षित असलेले सहायक अनुदान प्राप्त झालेले नाही. तसेच मालमत्ता, पाणीपट्टी व इतर स्रोतातून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे २०१५-१६ या वर्षाच्या अर्थसंकल्पाला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ४९०.१४ कोटींची कात्री लावली आहे. १४७४.९८ कोटींचा सुधारित तर २०१६-१७ या वर्षाचा १५३४.४५ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प बुधवारी त्यांनी स्थायी समितीला सादर केला आहे.महापालिकेचा सन २०१५-१६ या वर्षाचा अर्थसंकल्प १९६५.१२ कोटींचा होता. परंतु २६ जानेवारीपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत ७०० कोटींचाच महसूल झाला. पुढील दोन महिन्यात ७७४ कोटींचे उत्पन्न अपेक्षित असून ३१ मार्च २०१६ पर्यंत १४७४ .९८ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. हर्डीकर यांनी २०१५-१६ या वर्षाचा १२९४.६७ कोटीचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला होता.दोन महिन्यात ७७४ कोटीनागपूर : पुढील दोन महिन्यात ३१ मार्च पर्यंत ७७४ कोटींची कर वसुली करावी लागणार आहे. यात एलबीटीपासून १८५ कोटी, मालमत्ता करातून १४० कोटी, पाणीपट्टीतून ८२ कोटी, नगररचना विभाग ५३ कोटी, एलबीटी अनुदान १५५ कोटी, बाजार विभागाकडून ३.८५ कोटी, इतर विभागापासून ५० कोटी तर शासनाकडून १०० कोटींचे अनुदान अपेक्षित असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले. विकास कामांना बाधा नाहीमहापालिकेच्या अर्थसंकल्पाला आयुक्तांनी २२ टक्के कात्री लावली आहे. परंतु यामुळे शहरातील विकास कामांवर कोणत्याही स्वरूपाचा परिणाम होणार नाही. निधीची गरज भासलीच तर सभागृहाची मंजुरी घेऊ न तो उपलब्ध केला जाईल. प्रशासनाने वसुलीकडे लक्ष न दिल्याने परिणाम झाला आहे. अर्थसंकल्पातील ८० टक्के कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. रमेश सिंगारे, अध्यक्ष स्थायी समिती, महापालिकाउद्दिष्ट साध्य करणारमहापालिकेचा सुधारित व प्रस्तावित अर्थसंकल्प वास्तवावर आधारित आहे. ज्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आहेत. त्या पूर्ण करण्यात येतील. केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा यात समावेश करण्यात आलेला नाही. परंतु जे उद्दिष्ट गृहीत धरण्यात आलेले आहे. ते निश्चित पूर्ण केले जाईल. नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त बोजा पडणार नाही.श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका