शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण : ‘वर्क फ्रॉम होम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 00:04 IST

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार मी स्वत:ला होम आयसोलेट करून घेतले आहे. गेल्या १४ दिवसात माझ्याशी संपर्क आलेल्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे.

ठळक मुद्देसंपर्कात आलेल्यांना तपासणी करून घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट  करून याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार मी स्वत:ला होम आयसोलेट करून घेतले आहे. गेल्या १४ दिवसात माझ्याशी संपर्क आलेल्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे.आपण आयसोलेशनमध्ये असून नागपूर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी घरातूनच काम करणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले आहे. ही लढाई आपण जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.नागपूर शहरात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना वेळोवेळी काळजी घेण्याचे व नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.अटेंडंट पॉझिटिव्ह आल्याने केली चाचणीदोन दिवसांपूर्वी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बंगल्यातील अटेंडंट पॉझिटिव्ह आला, यामुळे सोमवारी मुंढे कुटुंबीयांची चाचणी केली असता तुकाराम मुंढे आणि एक सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह आलेत. घरातील इतर सदस्य निगेटिव्ह आहेत.खासगी रुग्णालयांवर वॉच ठेवण्यासाठी पथक

कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत, कोरोना बाधितांची लुटमार होऊ नये, यासाठी तुकाराम मुंढे यांनी विशेष पथक स्थापन केले आहे.नागपूर शहरातील खासगी रुग्णालयांवर वॉच ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांना घालून दिलेल्या नियमांचे अंमलबजावणी होते की नाही, यावर विशेष पथक लक्ष ठेवणार आहे. रुग्णालयांची अचानक पाहणी करून काही आक्षेपार्ह आढळल्यास तात्काळ कारवाईचा बडगाही उगारण्यात येणार आहे. 

मुंढे यांना ‘लो व्हायरस लोड’मेयोने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, मनपा आयुक्त मुंढे यांच्या ‘आरटी-पीसीआर’ चाचणीत ‘लो व्हायरस लोड’ असल्याचे निदान झाले. त्यांनी तातडीने तपासणी केल्याने आजार पसरण्याचा धोका कमी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांना कुठलीही लक्षणे नाहीत. यामुळे होम आयसोलेशनचा निर्णय त्यांनी घेतला आहे.सेवाकार्य थांबणार नाहीमागील साडेपाच महिने कोरोना या विषाणूशी आपण सगळे लढा देत आहोत. कोरोनाच्या नागपुरातील एन्ट्री नंतर अत्यावश्यक सेवा म्हणून कार्य करताना माझ्यासोबत माझ्या प्रत्येक सहकाऱ्याने आवश्यक ती सर्व काळजी घेतली. मात्र, सेवा देताना कुठे ना कुठे कोरोना रुग्णांशी संपर्क येत गेला. यातून मनपाच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. आज मी स्वत: पॉझिटिव्ह निघालो. काळजी म्हणून मी गृह विलगीकरणात राहीन. परंतु, आपल्या सेवेचे कार्य थांबणार नाही. मी जेथे असेल तेथून नागपुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणे सुरू राहील. कारण मी जरी पॉझिटिव्ह आलो तरी आपण पॉझिटिव्ह येऊ नये, यासाठी माझी धडपड सुरूच राहील. जे पॉझिटिव्ह आलेत त्यांना योग्य उपचार मिळावे, यासाठी व्यवस्था सुदृढ ठेवण्याचा माझा संकल्प या काळातही पूर्णत्वास नेईल, अशी ग्वाही तुकाराम मुंढे यांनी दिली.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या