आयुक्त राधाकृष्णन बी. शुक्रवारी पदभार स्वीकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 20:31 IST2020-08-27T20:30:29+5:302020-08-27T20:31:44+5:30
नागपूर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी. शुक्रवारी सकाळी पदभार स्वीकारतील. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तुकाराम मुंढे यांच्याकडून ते फोनवरून पदभार स्वीकारतील.

आयुक्त राधाकृष्णन बी. शुक्रवारी पदभार स्वीकारणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी. शुक्रवारी सकाळी पदभार स्वीकारतील. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तुकाराम मुंढे यांच्याकडून ते फोनवरून पदभार स्वीकारतील.
राधाकृष्णन २००८ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. जालना जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, नाशिक जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य मेरिटाइम बोर्डचे अध्यक्ष व मुंबई म्हाडाचे मुख्याधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. महापालिका आयुक्त म्हणून नागपुरात प्रथमच ते पदभार स्वीकारत आहेत. नागपूर शहरातील कोरोना संकट, महापालिकेची बिकट आर्थिक स्थिती व विकास कामांना लागलेला ब्रेक अशी आव्हाने त्यांच्यापुढे आहेत.