लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या संपूर्ण जग तेल, गॅस, कोळसा यासारख्या पारंपरिक ऊर्जास्रोतांवर अवलंबून आहे. हे ऊर्जेचे स्रोत मर्यादित प्रमाणात असून, ते एक दिवस संपणार आहेत. त्यामुळे येणारा काळ अपारंपरिक ऊर्जेचा राहणार आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.उच्च न्यायालयाच्या इमारतीवर २०० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सोमवारी प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमात न्या. भूषण गवई, न्या. भूषण धर्माधिकारी व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना न्या. गवई यांनी अपारंपरिक ऊर्जेच्या महत्त्वावर विस्तृत मार्गदर्शन केले. पारंपरिक ऊर्जेच्या भरमसाट वापरामुळे पर्यावरणातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विदर्भातील चंद्रपूर शहर हे याचे उदाहरण आहे. प्रदूषणामुळे चंद्रपूरमध्ये वास्तव्य करणे धोकादायक झाले आहे. इतर शहरांच्या बाबतीत असे घडू नये याकरिता अपारंपरिक ऊर्जेवर भर देणे गरजेचे आहे. नागपूरमध्ये होत असलेल्या विधी विद्यापीठामध्ये बीओटी तत्त्वावर सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारले जात आहेत. १५ वर्षानंतर हे प्रकल्प विद्यापीठ प्रशासनाला हस्तांतरित केले जातील. असा प्रकल्प उच्च न्यायालयातही उभारला जावा हा विचार त्यातून पुढे आला व सतत पाठपुरावा केल्यानंतर सरकारने या प्रकल्पासाठी निधी मंजूर केला. असे प्रकल्प शक्य त्या प्रत्येक ठिकाणी उभारले गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.न्या. धर्माधिकारी यांनी राज्यकर्त्यांची न्यायालयासंदर्भातील भूमिका बदलल्यामुळे आनंद व्यक्त केला. पूर्वी राज्यकर्ते न्यायालयांमधील सोयीसुविधांकडे दूर्लक्ष करायचे. ते चित्र आता बदलले आहे. राजकारणात नवीन पिढी आली आहे. ते न्यायालयांकडे गांभीर्याने पाहायला लागले आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यांनी बावनकुळे यांची थोडी गंमतही केली. न्यायालयात येऊन आनंद झाला असे बावनकु ळे म्हणाले होते. त्यावर न्या. धर्माधिकारी यांनी तुमचा प्रवेश या कार्यक्रमापुरता मर्यादित ठेवा, त्यापुढे जाऊ नका, अशी कोटी केली.मुदगल यांनी सौर ऊर्जा प्रकल्पाची व त्यामुळे होणाऱ्या फायद्यांची विस्तृत माहिती दिली. हायकोर्ट बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी संचालन केले तर, महाऊर्जाचे प्रादेशिक संचालक सारंग महाजन यांनी आभार मानले.सौर ऊर्जा बळकट करण्याचे धोरण : बावनकुळेसौर ऊर्जा काळाची गरज आहे. त्यामुळे सौर ऊर्जा अधिक बळकट करण्याचे केंद्र व राज्य सरकारचे धोरण आहे अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यक्रमात बोलताना दिली.येणाऱ्या
येणारा काळ अपारंपरिक ऊर्जेचा : न्या. भूषण गवई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:56 IST
सध्या संपूर्ण जग तेल, गॅस, कोळसा यासारख्या पारंपरिक ऊर्जास्रोतांवर अवलंबून आहे. हे ऊर्जेचे स्रोत मर्यादित प्रमाणात असून, ते एक दिवस संपणार आहेत. त्यामुळे येणारा काळ अपारंपरिक ऊर्जेचा राहणार आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.
येणारा काळ अपारंपरिक ऊर्जेचा : न्या. भूषण गवई
ठळक मुद्देहायकोर्टातील सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन