शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 01:15 IST

गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून सर्वसमावेशक विचारांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकप्रकारे गांधीवादी विचारांना संपविण्याचा प्रयत्न होत असून हिंदूराष्टÑ बनविण्याचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देमहात्मा गांधी विचार मंच : साहित्यिक, लेखक, पत्रकार, गांधीवाद्यांचे चिंतन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून सर्वसमावेशक विचारांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकप्रकारे गांधीवादी विचारांना संपविण्याचा प्रयत्न होत असून हिंदूराष्टÑ बनविण्याचा धोका वाढला आहे. घटनेच्या विरोधात पावले उचलली जात आहेत. ही परिस्थिती पाहता लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांना आता पुढाकार घेत एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे चिंतावजा मत साहित्यिक, लेखक, पत्रकार, गांधीवाद्यांनी व्यक्त केले.महात्मा गांधी विचार मंचतर्फे ‘भारतातील प्रचलित परिस्थिती आणि नागरिकांची कर्तव्ये’ या विषयावर शनिवारी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लीलाताई चितळे होत्या. या वेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रा. भाऊ लोखंडे, हरिभाऊ केदार, प्रा. जैमिनी कडू, ज्येष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे, शबीर अहमद विद्रोही, मा.म.गडकरी आणि नागेश चौधरी उपस्थित होते.या वेळी हरिभाऊ केदार यांनी गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येवर चिंता व्यक्त करीत समाजव्यवस्था बदलण्याचा हा प्रयत्न रोखण्याची गरज व्यक्त केली. ज्येष्ठ गांधीवादी मा.म.गडकरी यांनी समाजातील शेवटच्या घटकातील माणसाकडे कुणाचेच लक्ष नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत झाल्याचे मान्य केले. ही स्थिती बदलण्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. साहित्यिक नागेश चौधरी म्हणाले, आरएसएसची नीती चालविण्यासाठी मोदींना प्यादा बनविण्यात आले आहे. हिंदूराष्टÑ बनविण्याच्या प्रयत्नामुळे देशात अराजकता पसरल्याशिवाय राहणार नाही. ज्येष्ठ साहित्यिक जैमिनी कडू यांनी भाजपा हा आरएसएसचा मुखवटा असल्याचा आरोप करीत भाजपात कर्तबगार नेता नसल्याची केविलवाणी स्थिती असल्याचे सांगितले. अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, गांधीजींच्या विचारांना छेद दिला जात आहे. मजूर, शेतमजूर, कामगार मरत आहते. शहिदांचा अपमान केला जात आहे. अशास्थितीत निर्णयाची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, श्रीरामाचे नाव घेऊन देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. चरख्याच्या मागे बसून कोणी महात्मा गांधी होत नाही. महात्मा गांधींचे विचार मानवतेकडून विकासाकडे नेणारे आहेत. ते संपविण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे कॉँग्रेसने एकवटण्याची वेळ आली आहे.