शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमानुष मनुस्मृतीचे दहन

By admin | Updated: March 11, 2016 03:11 IST

मानवाला मानव म्हणून नाकारणाऱ्या अमानुष मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम दहन केले.

कलार समाज रस्त्यावर : दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागपूर : मानवाला मानव म्हणून नाकारणाऱ्या अमानुष मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम दहन केले. तेव्हा बहुजन समाजातील जी कुणी व्यक्ती मनुस्मृतीचे वाचन करेल, तो तिला जाळल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते. त्यांचे ते म्हणणे अनेकदा खरे ठरले. आज पुन्हा त्याचा प्रत्यय आला. जैन कलार समाजातर्फे गुरुवारी सायंकाळी मराठी भाषांतरित सार्थ श्रीमनुस्मृतीचे दहन करण्यात आले. महाराष्ट्रात बंदी असलेल्या मनुस्मृतीचे मराठी भाषांतर विष्णुशास्त्री बापट यांनी केले असून पुणे येथील राजेश प्रकाशनने ते पुस्तक प्रकाशित केले आहे. राज्यातील अनेक पुस्तकालयात उपलब्ध आहे. यावर लोकमतने ९ मार्च रोजीच्या अंकात विशेष वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते. हे वृत्त प्रकाशित होताच सर्वत्रच याचा निषेध केला जात आहे. विविध समाज संघटनाकडून याचा निषेध केला जात आहे. विधिमंडळातही यावर आवाज उचलण्यात आला आहे. अखिल भारतीय सर्ववर्गीय कलार समाजातर्फे गुरुवारी सायंकाळी कलार समाज सांस्कृतिक भवन रेशीमबाग येथे या मराठी भाषांतरित मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. कलार समाजासह बहुजन समाजातील सर्वच जाती धर्माबद्दल अतिशय विषारी लेखन असलेल्या या मनुस्मृतीचा निषेध करीत याचे मराठी भाषांतर करणाऱ्या लेखकासह प्रकाशक व वितरकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाने ही मागणी मान्य न केल्यास कलार समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला. मनुस्मृतीचे मराठी भाषांतर करणाऱ्याविरुद्ध समाजातर्फे लवकरच पोलिसात तक्रार दाखल केली जाईल. वेळ पडली तर न्यायालयातही याचिका दाखल करू, असेही यावेळी सांगण्यात आले. अ. भा. सर्ववर्गीय कलार समाजाचे अध्यक्ष भूषण दडवे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात कार्याध्यक्ष डॉ. राजाभाऊ दुरुगकर, प्रा. रमेश कोलते, नारायण टाले, अ‍ॅड. सूर्यकांत जयस्वाल, डॉ. बी.आर. काकपुरे, फाल्गुन उके, विजय हरडे, विजय चौरागडे, मारोतराव शनिवारे, नरेंद्र वासेकर, डायाभाई मेहरे, किशोर शिवहरे, खेमचंद राय, रमेश जायस्वाल, दमोधर दियेवार, मोहन सोनवने, ओंकार सूर्यवंशी आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)