शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
4
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
5
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
6
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
7
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
8
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
9
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
10
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
11
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
12
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
13
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
14
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
15
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
16
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
17
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
18
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
19
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
20
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!

होळीत रंगला रंगांचा बाजार : भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:34 IST

होळी म्हणजे नाते जपणारा आणि विविधरंगी रंगांचा सण. धुळवडीत संपूर्ण देशात रंगांचे उधाण असते. होळीच्या निमित्ताने रंग आणि पिचकाऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या वर्षीपर्यंत चिनी रंगांचे वर्चस्व होते. पण यंदा भारतीय बनावटीचे रंग आणि पिचकाऱ्यांना जास्त मागणी आहे. रंग, पिचकारी, गाठींच्या किमतींमध्ये १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. हर्बल आणि नैसर्गिक रंगांना जास्त मागणी आहे.

ठळक मुद्देचीनच्या फॅन्सी पिचकाऱ्यांची रेलचेल, लोकांना हवे ब्रॅण्डेड, हर्बल व नैसर्गिक रंग, गाठी महाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : होळी म्हणजे नाते जपणारा आणि विविधरंगी रंगांचा सण. धुळवडीत संपूर्ण देशात रंगांचे उधाण असते. होळीच्या निमित्ताने रंग आणि पिचकाऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या वर्षीपर्यंत चिनी रंगांचे वर्चस्व होते. पण यंदा भारतीय बनावटीचे रंग आणि पिचकाऱ्यांना जास्त मागणी आहे. रंग, पिचकारी, गाठींच्या किमतींमध्ये १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. हर्बल आणि नैसर्गिक रंगांना जास्त मागणी आहे.भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांकडे कलनागपुरातही होळीनिमित्त बाजारपेठ सजली असून खरेदीसाठी लोकांची गर्दी आहे. पारंपरिक व हर्बल रंग, गुलाल आणि लहानांना आकर्षित करणाऱ्या  फॅन्सी आणि कार्टुन पिचकाऱ्यांनी दुकाने सजली आहेत. यामध्ये विविध प्रकारचे मुखवटे, टोप्यांचा समावेश आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर चीनचा विरोध होत असतानाही चीनच्या फॅन्सी पिचकाऱ्यांची बाजारात रेलचेल आहे. पण मेड इन इंडिया वस्तूंकडे लोकांचा जास्त कल आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत खरेदीत गर्क आहेत. यंदा जीएसटीमुळे वस्तूंचे भाव वाढले असून भारतीय आणि चिनी बनावटीच्या पिचकाऱ्यांमध्ये स्पर्धेचे वातावरण आहे.लोकांना हवे ब्रॅण्डेड रंगरेशीम ओळ येथील रंगाचे व्यापारी अतुल लांजेवार यांनी सांगितले की, यावर्षी गुलाल आणि रंगाच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. सर्व रंगाच्या गुलालासह गणेश, मुर्गा, तोता ब्रॅण्डच्या रंगाला जास्त मागणी आहे. हे रंग २० ते ५० ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये असून किंमत २५ ते १०० रुपयांपर्यंत आहे. आठवड्यापूर्वीच विक्री सुरू झाली आहे. यासह गोल्डन रंग, वॉर्निश आणि उत्तम क्वॉलिटीच्या पॅक रंगांची मागणी वाढली आहे. लिक्विड रंगाला लोकांची पसंती आहे. धुलिवंदनासाठी लाल, गुलाबी, निळा, जांभळा, हिरवा, पिस्ता, भगवा, नारंगी, पिवळा असे नैसर्गिक रंग पाऊचमध्ये बाजारात उपलब्ध आहेत.हर्बल रंगाला जास्त मागणीधुळवडीला रासायनिक रंगांचा वापर केल्यामुळे त्वचेवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन, अलीकडे नागरिक पर्यावरणपूरक किंवा नैसर्गिक रंगांचा वापर करण्यावर भर देतात. परंतु बाजारात विक्रेते ‘नैसर्गिक रंग’ किंवा ‘इको-फ्रेंडली’ अशा नावांनी रासायनिक रंगांची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. इको फे्रंडली होळी खेळण्यासाठी हर्बल रंग आणि गुलालाला जास्त पसंती देतात. पारंपरिक गुलाल प्रति किलो ४० ते ५० रुपये तर हर्बल गुलाल ३०० ते हजार रुपये किलोपर्यंत विक्रीस आहे.दुसरीकडे, रासायनिक रंगांमधील घटकांच्या प्रमाणाबाबत कोणतीही व्याख्या निश्चित न करण्यात आल्याने उत्पादक कोणत्याही रसायनांपासून तयार झालेले रंग बाजारात आणत आहेत. नैसर्गिक रंगांची बाजारातील उपलब्धता मागणीच्या तुलनेत फारच नगण्य आहे. तसेच बाजारातील रंगाच्या तुलनेत हे रंग महागही आहेत.गन, टँक, पाईप्स, भीम, डोरेमोन पिचकाऱ्यांना मागणीधुळवडीसाठी बाजारात उपलब्ध पिचकाऱ्या बच्चे कंपनीचे लक्ष वेधून घेत आहेत. लहानांपासून दोन लिटर रंग भरण्याइतपत पिचकाऱ्या बाजारात विक्रीस आहेत. यंदा गन, टँक, सिलिंडर, मोटू-पतलू, शूटर, एअर व मशीन गन, पाईप्स तसेच छोटा भीम, डोरेमोन, शिनचेन, अर्जुन आदी कार्टुन आणि सेलेब्रिटींचे चित्र असलेल्या पिचकाºया विकल्या जात आहेत. लहान मुलांकडून पारंपरिक पिचकाऱ्यांऐवजी खेळणी आणि कार्टुन पिचकाऱ्यांना जास्त मागणी आहे. यंदा मोबाईल, बाहुल्या, बंदुकी, प्राणी, पक्षी आदी आकाराच्या पिचकाऱ्या बाजारात विक्रीस आहेत. गेल्यावर्षीच्या मोठ्या पिचकाऱ्यांच्या किमतीमध्ये २० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. लहान मुलांमध्ये आकर्षण असलेली छोटा भीम, डोरेमोन, शिनचेन, अर्जुन आदी कार्टुन्सच्या पिचकाऱ्या थेट २५० ते ५०० रुपयांमध्ये विकल्या जात आहेत.नवीन स्टाईलचे विग व कॅपरबर आणि प्लास्टिकच्या हॉरर मुखवट्यासह नवीन स्टाईलचे विग आणि कॅप बाजारात आल्या आहेत. चेहºयावर लावण्यात येणारे मुखवटे १०० रुपयांपर्यंत आणि आकर्षक डिझाईनच्या कॅप ब्लॅक, व्हाईट, गोल्डन आणि मल्टी कलर्समध्ये ५० ते १०० रुपयांदरम्यान उपलब्ध आहेत.नातेसंबंधात गोडवा आणणारी गाठीहोळीत नातेसंबंधात गोडवा आणण्याचे माध्यम म्हणून ‘गाठी’ची महती आहे. साखरेच्या पाकापासून तयार होणाऱ्या गाठीला पारंपरिक मान्यता आहे. गुढीपाडव्यातही गाठीला विशेष महत्त्व आहे. शिवाय उष्माघाताने प्रभावित व्यक्तीला पाण्यात गाठी मिसळून पाजल्यास तात्काळ आराम मिळतो. हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहेत. होळीत गाठ्यांना जास्त मागणी असते.यंदा १० ते १५ टक्के महागगाठीचे व्यावसायिक मनीष शाहू यांनी सांगितले की, यंदा गाठ्यांवर आधुनिकतेचा रंग चढला आहे. होळीत गुलाल आणि गाठी या दोन नातेसंबंध अधिक दृढ करणाऱ्या वस्तू आहेत. पूजेसाठी गाठीचे जास्त महत्त्व आहे. यंदा गाठीच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी महागल्या आहेत. ठोक बाजारात ६० ते ७० रुपये तर किरकोळमध्ये ८० ते ९० रुपये प्रति किलो भावाने विक्री होत आहे. साधी आणि बत्तासा प्रकारात आहेत.यंदा धागे, साखरेची किंमत आणि कारागिरीमुळे भाव वाढले आहेत. शांतीनगर, कावरापेठ, मस्कासाथ, लालगंज आदींसह शहरात गाठी निर्मितीचे २० पेक्षा जास्त कारखाने आहेत. गाठ्या तयार करण्यासाठी खास कानपूर, लखनौ आणि अलाहाबाद येथून होळीच्या २० ते २५ दिवसांपूर्वी कारागीर येतात. गाठ्या तयार करून परत जातात. गाठ्यांच्या निर्मितीसाठी साखर कोल्हापूर आणि सोलापूर या भागातून येते.लोकांचा पर्यटनाकडे कलबहुतांश लोकांनी होळीचे प्लॅनिंग केले आहे. काही लोक धार्मिक स्थळांकडे तर काही पर्यटन स्थळांवर जाऊन आपापल्या पद्धतीने होळी सण साजरा करण्याच्या तयारीत आहेत. खानपानसह डीजेची व्यवस्था केली आहे.चिनी उत्पादनांचा विरोध कितपत यशस्वी ठरणार?विविध संघटनांतर्फे चिनी उत्पादनांचा विरोध करण्यात येतो. यंदाही होळीनिमित्त बाजारात आलेल्या चिनी पिचकाऱ्या, रंग, मुखवटे यांचा विरोध करण्यात येत आहे. पण हा विरोध व्यावसायिकरीत्या शक्य आहे का, यावर प्रश्नचिन्ह आहे. यावर लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. मौलाना मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास चीनचा विरोध असल्यामुळे लोकांमध्ये संतापाची भावना आहे. सोशल मीडियावरही चीनचे उत्पादन खरेदी करू नये, अशी मागणी करण्यात येत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनने चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. होळी सणाात गिफ्ट पॅक, स्पे्र, म्युझिकल पिचकारी, गुलाल पिचकारी आदींच्या विक्रीत चीनचे मिश्रण पाहायला मिळत आहे. या उत्पादनांची मुलांमध्ये क्रेझ आहे. लोकांकडून मेड इन इंडियाची मागणी करीत असताना बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध चीनच्या उत्पादनांवर बंदी टाकण्याची मागणी कितपत यशस्वी होईल, हे सांगणे कठीण असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Holiहोळीnagpurनागपूर