सायकलवरून जाताना घोड्याशी झाली धडक, ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, नागपूरची घटना
By दयानंद पाईकराव | Updated: March 2, 2024 21:39 IST2024-03-02T21:38:51+5:302024-03-02T21:39:20+5:30
रमेश माणिकराव निकम (६६) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव

सायकलवरून जाताना घोड्याशी झाली धडक, ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, नागपूरची घटना
दयानंद पाईकराव, नागपूर: घोडा अंगावर आल्यामुळे सायकलवरून खाली पडून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
रमेश माणिकराव निकम (६६, रा. साईनगर हुडकेश्वर) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. ते २७ फेब्रुवारीला सायंकाळी ७.३० वाजता आपल्या घराजवळील मैदानावरून सायकलने जात होते. तेवढ्यात एक घोडा त्यांच्या अंगावर आल्यामुळे ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला मुक्का मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले असता शनिवारी २ मार्चला दुपारी १.३० वाजता उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मिळालेल्या वैद्यकीय सुचनेवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे.