महाविद्यालयांवर टांगती तलवार!

By Admin | Updated: June 16, 2014 01:14 IST2014-06-16T01:14:11+5:302014-06-16T01:14:11+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून काही महाविद्यालयांना प्रवेशाची खुलेआम सूट दिली असली, तरी उच्च शिक्षण संचालनालयाने

College hanging sword! | महाविद्यालयांवर टांगती तलवार!

महाविद्यालयांवर टांगती तलवार!

उच्च शिक्षण विभागाने मागितला रिपोर्ट : महाविद्यालय अडचणीत
आशिष दुबे - नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून काही महाविद्यालयांना प्रवेशाची खुलेआम सूट दिली असली, तरी उच्च शिक्षण संचालनालयाने मात्र अशा महाविद्यालयांसंबंधी कठोर भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून संचालनालयाने नागपूर विद्यापीठाला संबंधित महाविद्यालयांचा रिपोर्ट मागितला आहे. माहिती सूत्रानुसार यासाठी संचालनालयाने त्यांच्या विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून एक पत्र जारी केले आहे. त्या पत्रात शैक्षणिक सत्र २०१४ -१५ मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी संबंधित महाविद्यालयांचा रिपोर्ट संचालनालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्या रिपोर्टमध्ये संबंधित महाविद्यालयातील मान्यताप्राप्त शिक्षकांची संख्या,अभ्यासक्रम, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध पायाभूत सोयी-सुविधा व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषाचे पालन, याविषयी सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. जाणकारांच्या मते,संचालनालयाला विद्यापीठाकडून तो रिपोर्ट प्राप्त होताच त्याची समीक्षा केली जाणार आहे. यात एखादे महाविद्यालय नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळून आल्यास त्याविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस केली जाऊ शकते. संचालनालयाने संबंधित महाविद्यालयांची अचूक माहिती मिळावी, यासाठी यापूर्वीच ६५ पथके तयार करून, आवश्यक ती माहिती गोळा केली आहे. त्या पथकांनी आपला अहवाल संचालनालयाकडे सादर केला आहे. यानंतर आता विद्यापीठाकडून जाणाऱ्या अहवालाशी त्या रिपोर्टची तुलना केली जाणार आहे.

Web Title: College hanging sword!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.