सोशल मिडियावरील अफवांचा नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनाही मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 09:38 PM2020-03-13T21:38:29+5:302020-03-13T21:40:04+5:30

सावधान, कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहे. मोठ्या प्रमाणावर फेक मेसेज व्हायरल होत आहेत. अनेकांना याचा मनस्ताप होतोय. खुद्द नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

The collectors also upset the rumors on social media | सोशल मिडियावरील अफवांचा नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनाही मनस्ताप

सोशल मिडियावरील अफवांचा नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनाही मनस्ताप

Next
ठळक मुद्देम्हणे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह : सायबर सेलकडे तक्रार, कडक कारवाईचे निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : सावधान, कोरोनाबाबतसोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहे. मोठ्या प्रमाणावर फेक मेसेज व्हायरल होत आहेत. अनेकांना याचा मनस्ताप होतोय. खुद्द नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. सोशल मीडियावरील एका वेबसाईटने जिल्हाधिकाऱ्यांनाच कोरोना विषाणूची लागण झाल्याचे खोटे वृत्त प्रसारित केले. त्यानंतर त्यांना सकाळपासून नातेवाईकांसह अनेकांचे फोन येऊ लागले. याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन कामावर झाला. अखेर जिल्हधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी स्वत: पत्रपरिषद घेऊन हे वृत्त खोटे असल्याचा खुलासा केला. तसेच विशेष शाखा व सायबर सेलकडे तक्रार केली असून कोरोनाबाबत अफवा पसरवून समाजात भीती पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले की, कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहे. एका रुग्णाच्या मुलीचे रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह आल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आली. सोशल मीडिया वापरताना विशेषत: कोरोनाबाबत खबरदारी घेण्याबाबत मी अनेकदा सांगत आहे. तरीही फेक मेसेज सुरूच आहेत. स्वत: मलासुद्धा याचा फटका बसला. सुरुवातीला मी याकडे दुर्लक्ष केले, परंतु ‘लयभारी’ आणि आणखी एका वेबसाईटने सर्रासपणे मला (नागपूरचे जिल्हाधिकारी ठाकरे) यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त प्रसारित केले. त्यामुळे सकाळपासून मला अनेकांचे फोन येत आहेत. माझे दैनंदिन काम प्रभावित झाले आहे. त्यामुळे मला याची दखल घ्यावी लागली. यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे. यासोबतच सायबर सेलला सोशल मीडियावर कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाईचे निर्देशसुद्धा देण्यात आले आहेत.

Web Title: The collectors also upset the rumors on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.