आचारसंहितेपूर्वी मनपा स्थायी समितीची घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:20 AM2019-03-10T00:20:13+5:302019-03-10T00:21:14+5:30

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. याचा विचार करता महापालिकेतील सत्तापक्षाचे नेते व पदाधिकारी प्रस्तावित विकास कामांना तातडीने मंजुरी देण्याच्या प्रयत्नात आहेत. तीन दिवसापूर्वी स्थायी समिती अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणारे प्रदीप पोहाणे यांनी शुक्रवारी एक तासाच्या अंतरात समितीच्या दोन बैठका घेऊ न कोट्यवधीच्या फाईलला मंजुरी दिली. यात प्रामुख्याने शासकीय अनुदानाच्या फाईलचा समावेश होता.

Before the Code of Conduct, the Standing Committee of NMC start horse running | आचारसंहितेपूर्वी मनपा स्थायी समितीची घोडदौड

आचारसंहितेपूर्वी मनपा स्थायी समितीची घोडदौड

Next
ठळक मुद्देतासाभरात दोन बैठका: कोट्यवधीच्या विकास कामांना मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. याचा विचार करता महापालिकेतील सत्तापक्षाचे नेते व पदाधिकारी प्रस्तावित विकास कामांना तातडीने मंजुरी देण्याच्या प्रयत्नात आहेत. तीन दिवसापूर्वी स्थायी समिती अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणारे प्रदीप पोहाणे यांनी शुक्रवारी एक तासाच्या अंतरात समितीच्या दोन बैठका घेऊ न कोट्यवधीच्या फाईलला मंजुरी दिली. यात प्रामुख्याने शासकीय अनुदानाच्या फाईलचा समावेश होता.
सोमवारी स्थायी समितीची पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती आहे. यात शिल्लक फाईलला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ८ मार्चला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याची चर्चा होती. मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. वास्तविक निवडणूक आयोगाकडून अद्याप अशा प्रकारचे दिशानिर्देश जारी करण्यात आलेले नाहीत. मात्र आचारसंहिता गृहीत धरता सत्तापक्ष व प्रशासन सक्रिय झाले आहे. आचार संहिता लागू होताच सर्व प्रकारची विकास कामे ठप्प होणार असल्याने पदाधिकारी व अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.
प्रदीप पोहाणे यांनी ५ मार्चला पदभार स्वीकारला. त्यानंतर ८ मार्चला दुपारी १ वाजता स्थायी समितीची बैठक ेतली. यात १३ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर दुपारी २ वाजता पुन्हा विशेष बैठक घेतली. यात २२ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यात प्रामुख्याने प्रकल्प व लोककर्म विभागाच्या प्रस्तावांचा समावेश होता. रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली.
पदाधिकारी झाले सक्रिय
आवश्यक असलेल्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी घेण्यासाठी महापालिकेतील पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. शुक्रवारी ज्येष्ठ पदाधिकारी महापालिकेत ठाण मांडून होते. अध्यक्षांची सतत चर्चा करीत होते. शनिवारी सुटी असूनही महापालिका मुख्यालयात आवश्यक विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्याची धावपळ सुरू होती.

Web Title: Before the Code of Conduct, the Standing Committee of NMC start horse running

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.