शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नागपूर महापालिकेच्या अर्थसंकल्पावर आचारसंहितेचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 8:23 PM

महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा सुधारित व २०१९-२० या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अभिजित बांगर फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यात स्थायी समितीला सादर करणार आहेत. त्यानंतर या अर्थसंकल्पाला सभागृहाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. परंतु मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने सभागृहाची मंजुरी घेता येणार नाही. यामुळे अर्थसंकल्प आचारसंहितेच्या सावटात सापडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआयुक्तांच्या सुधारित अर्थसंकल्पात ३० टक्के कात्रीफेब्रुवारीच्या अंंतिम आठवड्यात सादर करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा सुधारित व २०१९-२० या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अभिजित बांगर फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यात स्थायी समितीला सादर करणार आहेत. त्यानंतर या अर्थसंकल्पाला सभागृहाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. परंतु मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने सभागृहाची मंजुरी घेता येणार नाही. यामुळे अर्थसंकल्प आचारसंहितेच्या सावटात सापडण्याची शक्यता आहे.अर्थसंकल्पासाठी महापालिकेच्या वित्त विभागाने सर्व विभागाकडून आर्थिक लेखाजोखा मागितला आहे. सर्व विभागांकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर आयुक्त यात सुधारणा करून, सुधारित व प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करणार आहेत. स्थायी समितीने २,९४६ कोटींचा अर्थसंकल्प दिला होता. अर्थसंकल्पातील अपेक्षित उत्पन्नाचा आकडा गाठण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मोठ्या प्रमाणात शासकीय अनुदान प्राप्त करण्यात यश आले. परंतु महापालिकेचे मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता, नगर रचना, जलप्रदाय व बाजार विभागाकडून उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता नाही. याचा विचार करता वास्तव उत्पन्नाचा विचार करून, आयुक्तांनी याआधीच खर्चाला ३० टक्के कात्री लावली आहे.अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच कात्री लावलेली असल्याने आचारसंहितेमुळे सभागृहाची मंजुरी रखडली तर याचा निकषांच्या आधारावर खर्च करावा लागणार आहे.स्थायी समितीने वर्ष २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात मालमत्ता कराच्या वसुलीचे ५०९ कोटींचे उद्दिष्ट निर्धारित केले होते. परंतु आजवर हा आकडा १७० कोटीपर्यंतच पोहचला आहे. आता ४५ दिवसात ३३९ कोटींची वसुली करणे अशक्य आहे. प्रशासनाने जोर लावला तरी २४० कोटींच्या आसपास वसुली राहणार आहे. मार्च महिन्याला सुरुवात होताच महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामावर ड्युटी लागणार आहे. याचाही वसुलीवर परिणाम होणार आहे. अशापरिस्थितीत महापालिकेला कें द्र व राज्य सरकारच्या अनुदानावर विसंबून राहण्याशिवाय पर्याय नसल्याने, शासनाकडून १७५ कोटींचे विशेष अनुदान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.विशेष सभेचा पर्यायमहापालिकेची सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारीला होत आहे. यात आयुक्तांचा अर्थसंकल्प मंजुरीसाठी ठेवणे शक्य होणार आहे. अशा अर्थसंकल्पाला आचारसंहितेपूर्वी सभागृहाची मंजुरी घ्यावयाची झाल्यास विशेष सभा घ्यावी लागणार आहे. अन्यथा अर्थसंकल्पाला मंजुरी घेण्यासाठी आचारसंंहिता संपण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. असे झाले तर मे महिन्यात मंजुरी मिळेल.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प