शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

अन् त्यांच्या छातीवर चढला कोबरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:12 IST

कोबरा जातीचा साप जहाल विषारी मानला जातो. त्यामुळे हा साप पुढ्यात आल्यास चांगल्याचांगल्यांची घाबरगुंडी उडते. मग, हा साप कुणाच्या छातीवर चढून बसल्यास काय होईल? त्याची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. परंतु, शहरातील एक व्यक्ती नुकतीच या अनुभवातून गेली. त्या रात्रीचा थरार त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या अंगावर काटा आणतो. सुदैवाने वाचलो हे एकच वाक्य घटनेचा अनुभव सांगताना त्यांच्या मुखातून बाहेर पडते.

ठळक मुद्देघरातील थरार : सुदैवाने टळली वाईट घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोबरा जातीचा साप जहाल विषारी मानला जातो. त्यामुळे हा साप पुढ्यात आल्यास चांगल्याचांगल्यांची घाबरगुंडी उडते. मग, हा साप कुणाच्या छातीवर चढून बसल्यास काय होईल? त्याची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. परंतु, शहरातील एक व्यक्ती नुकतीच या अनुभवातून गेली. त्या रात्रीचा थरार त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या अंगावर काटा आणतो. सुदैवाने वाचलो हे एकच वाक्य घटनेचा अनुभव सांगताना त्यांच्या मुखातून बाहेर पडते.विलास झोडे असे त्या व्यक्तीचे नाव असून बेलतरोडी पोलीस ठाण्यामागे त्यांचे घर आहे. गेल्या बुधवारी रात्री झोडे कुटुंबीय गाढ झोपेत होते. रात्री २ च्या सुमारास त्यांच्या घरात कोबरा जातीचा साप शिरला. त्या सापाने विलास यांच्या अंगावर चढल्यानंतर छातीवर ठाण मांडले होते. दरम्यान, विलास यांना हलकी जाग आली व त्यांनी काठी समजून सापाला खाली फेकले. खाली त्यांची पत्नी व मुले झोपले होते. तो साप त्यांच्या अंगावर पडला. त्यामुळे पत्नी खडबडून जागी झाली व त्यांनी सापाला चादरीसह फेकून दिले. त्यानंतर सापाने चादरीतून बाहेर पडून फणा काढला. तो बराचवेळ एकाच ठिकाणी घुटमळत राहिला. दरम्यान, झोडे कुटुंबीयांनी सर्पमित्र शुभम पराळे यांना बोलावून घेतले. शुभम व त्यांचे सहकारी अक्षय कुप्पलवार हे पहाटे ३ वाजता झोडे यांच्या घरी पोहोचले. त्यांनी सापाला पकडून बरणीत बंद करताच झोडे कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. परंतु, ही घटना झोडे कुटुंबीयांना जीवनभराचा थरारक अनुभव देऊन गेली.शुभम पराळे यांनी गेल्या काही दिवसांत यासह अन्य चार घरांतून साप पकडून त्यांना वनात सोडून दिले. त्यांनी दीक्षितनगर येथील मानस पाल यांच्या घरातून सँडबुआ हा अविषारी साप, हुडकेश्वर येथील देवा मेश्राम यांच्या घरातून कोबरा साप तर, चक्रपाणीनगर येथील मनोज तोटे व मानेवाडा येथील महादेव मिटकरी यांच्या घरातून वेगवेगळ्या जातीचे साप पकडले. परंतु, या सर्वांपेक्षा झोडे कुटुंबीयांना चांगलीच दहशत सहन करावी लागली.नागरिकांनी सावध राहावेपावसाळ्यात बिळामध्ये पाणी साचत असल्यामुळे साप बाहेर पडतात. परिणामी, या दिवसांत नागरिकांनी सापांपासून सावध राहण्याची गरज आहे. विषारी साप चावणे प्राणघातक ठरू शकते.आर. एम. निंबेकर, आरएफओ.अशी सावधगिरी बाळगा१ - सापांचा वावर असलेल्या परिसरात जमिनीवर झोपणे टाळा.२ - घराच्या परिसरातील काडीकचरा नष्ट करा.३ - घरातील उंदराची बिळे बंद करा.४ - शेतात काम करताना पूर्ण पाय झाकणारे जोडे घाला.५ - दारे व खिडक्यांच्या फटी बंद करा.

 

टॅग्स :nagpurनागपूर