पुलगाव रेल्वे स्थानकावर कोळसा वॅगनला आग
By Admin | Updated: May 19, 2017 15:46 IST2017-05-19T15:46:36+5:302017-05-19T15:46:36+5:30
घुग्गुस वरुन भुसावळकडे जाणारी कोळसा स्पेशल मालगाडी पुलगाव स्थानकावर उभी असताना बोगीतील कोळशाने पेट घेतला. ही घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.

पुलगाव रेल्वे स्थानकावर कोळसा वॅगनला आग
आॅनलाईन लोकमत
पुलगाव (वर्धा) : तापमान वाढताच परिसरात आग लागण्याच्या घटनाही वाढल्या. घुग्गुस वरुन भुसावळकडे जाणारी कोळसा स्पेशल मालगाडी पुलगाव स्थानकावर उभी असताना बोगीतील कोळशाने पेट घेतला. ही घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. गत काही महिन्यातील ही नववी घटना असल्याचे स्टेशन व्यवस्थापक विनोद सवाई यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
बोगीताल कोळशाला रात्रीच्यावेळी आग लागल्याचे समजते. मात्र स्थानकावर उपस्थित कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली नाही. सकाळच्यावेळी ही बाब लक्षात आल्यानंतर धामणगाव येथून विद्युत पुरवठा खंडित करणाऱ्या चमूला पाचारण करण्यात आले. ही चमू पुलगाव स्थानकावर दाखल झाल्यानंतर विद्युत पुरवठा खंडित केला. दरम्यान केंद्रीय दारूगोळा भांडारातील अग्नीशामक दलास पाचारण करण्यात आले.
कोळशा मालगाडीला आग लागण्याची ही नववी घटना आहे. उन्हाळ्यात आगीच्या घटना घडत असताना रेल्वे स्थानकावर अग्निशमन यंत्रणा नाही. येथे २४ तास रेल्वे सुरक्षा रक्षक तसेच अग्निशमन यंत्रणा देण्याची मागणी आहे.