राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांचे नागपुरात आगमन मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 22:06 IST2019-08-17T22:03:34+5:302019-08-17T22:06:45+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोंविद व सविता कोंविद यांचे शनिवारी भारतीय वायूदलाच्या विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी १० वाजता आगमन झाले. यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती यांचे स्वागत केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव आणि महापौर नंदा जिचकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोंविद व सविता कोंविद यांचे शनिवारी भारतीय वायूदलाच्या विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी १० वाजता आगमन झाले. यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती यांचे स्वागत केले.
यावेळी महापौर नंदा जिचकार, एअर मार्शल आरकेएस सक्सेना, राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्वागत केले. विमानतळावरील स्वागताचा स्वीकार केल्यानंतर मा. राष्ट्रपती यांचे भारतीय वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने वर्धा येथील कार्यक्रमासाठी येथून प्रयाण झाले.