शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुख्यमंत्री म्हणाले.. महाराष्ट्रात अंमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 15:52 IST

नागपूर प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत डीएनए विभाग आणि वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन पार पडले.

नागपूर :  'सध्या महाराष्ट्रात अंमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही संपूर्ण जगातील अंमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच आहेत, असे वातावरण निर्माण केले जात असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते नागपुरातील अत्याधुनिक डीएनए फॉरेन्सिक लॅबच्या ऑनलाइन उद्घाटनप्रसंगी बोलत होते. 

प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत निर्भया योजनेंतर्गत जलदगती डीएनए विश्लेषण विभाग आणि राज्यातील एकमेव अशा वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत(Nitin Raut), पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Sunil Kedar), यांची उपस्थिती होती. 

या कार्यक्रमात केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे अंमली पदार्थप्रकरणी होत असलेल्या कारवाईबाबत बोलताना  मुख्यमंत्री म्हणाले, 'सध्या महाराष्ट्रात अंमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही संपूर्ण जगातील अंमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच आहेत, असे वातावरण निर्माण केले जात आहे.' तसेच, केंद्रातील तपास युनिटच या प्रकरणांचा तपास लावू शकतात, असे नाही. तर, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी २७ कोटी रुपयांचे 'हेरॉईन' पकडले होते पण त्यात 'हिरोईन'चा संबंध नसल्याने त्यांच्या कारवाईला प्रसिद्धी मिळाली नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. महाराष्ट्र पोलीस मजबूत आहेत आणि अनेक मोठ्या कामगिरी केल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र पोलिसांची ही ख्याती बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

'गुन्हेगारी जगताच्या मागे असताना तंत्रज्ञानाच्या बाबतीत पोलीस दलाने त्यांच्या एक पाऊल पुढे असायला हवे.' पोलीस दल हे राज्याचा पाठकणा असलेले दल आहे आणि त्यांच्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणे हे आपले कर्तव्य आहे आणि त्यासाठी प्रयत्नार्थ असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. 

दरम्यान, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा-२०१२ (पोक्सो) अंतर्गत गुन्ह्यांमध्ये ६० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने याविषयीच्या डीएनए नमुन्यांचे विश्लेषण जलदगतीने होणे आवश्यक आहे. त्यामुळे या नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी निर्भया योजनेंतर्गत जलदगती डीएनए विश्लेषण विभाग तयार करण्यात आला आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलSunil Kedarसुनील केदारNitin Rautनितीन राऊत