शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रशेखर बावनकुळेंशी बंददाराआड चर्चा? बैठकीत काय घडले? CM एकनाथ शिंदे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 12:08 IST

CM Eknath Shinde News: विदर्भातील वातावरण महायुतीमय आणि मोदीमय झाले आहे. मोदींच्या विजयाची जनतेनेचे आता गॅरंटी घेतली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

CM Eknath Shinde News: लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. महायुतीचे नेत्यांनी प्रचारावर भर दिला आहे. यातच तब्बल १० वर्षांनी पंतप्रधान मोदी चंद्रपुरात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरमध्ये सभा आहे. चंद्रपूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सभा घेत आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक बैठक झाली असून, बंददाराआड काही चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माझे मित्र आहेत. मी त्यांच्याकडे सदिच्छा भेटीला आलो. चंद्रशेखर बावनकुळे विदर्भामध्ये खूप मेहनत घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातील जागा महायुती लढवत आहे. विदर्भातील वातावरण महायुतीमय झाले आहे. मोदीमय झाले आहे. महायुतीचे विदर्भातील सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास वाटतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

गेल्या ५० वर्षांत काय केले, याचा हिशोब काँग्रेसने द्यायला हवा

विरोधकांना आरोप करण्याशिवाय काही काम राहिलेले नाही. देवेंद्र फडणवीस त्यांच्या भागात सभा घेत आहेत. त्यांना ज्या ठिकाणी बोलावले जाईल, तिथे ते जात आहेत. मीही प्रचारात सहभाग घेत आहेत. अजित पवारही प्रचार करत आहेत.  आम्ही सगळे प्रचारात गुंतलो आहोत. विरोधकांना काम उरलेले नाही. विरोधकांच्या आरोपांचा महायुतीवर काही परिणाम होणार नाही. महायुती मजबूत आहे. भक्कमपणे काम करत आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जात आहोत. ५०-६० वर्षे त्यांनी काही केले नाही. पंतप्रधान मोदी यांनी तेच गेल्या १० वर्षांत करून दाखवले. गेल्या ५० ते ६० वर्षांत काय केले, याचा हिशोब काँग्रेसने द्यायला हवा, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

दरम्यान, सरकारने केलेल्या कामाची पोचपावती या निवडणुकीत नक्की मिळेल, असा विश्वास व्यक्त करत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आम्ही सगळे एकच आहोत. रामटेक प्रति अयोध्या आहे. लोकांनीच आता गॅरंटी घेतली आहे. तसाच माहोल सगळीकडे पाहायला मिळत आहे. नितीन गडकरी यांच्या रॅलीत सहभागी झालो होतो. महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करणे. मोदींची हॅटट्रिक होऊ द्यायची, असे जनतेनेच ठरवले आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMahayutiमहायुतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४