उपराजधानीत पुन्हा ढगाळ वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 10:24 IST2020-01-18T10:23:50+5:302020-01-18T10:24:10+5:30
नागपूर शहरातील आकाशात पुन्हा एकदा ढग दाटून आले आहेत. त्यामुळे दिवसाच्या तापमानात १.३ अंश सेल्सिअसने वाढ नोंदवली गेली.

उपराजधानीत पुन्हा ढगाळ वातावरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील आकाशात पुन्हा एकदा ढग दाटून आले आहेत. त्यामुळे दिवसाच्या तापमानात १.३ अंश सेल्सिअसने वाढ नोंदवली गेली. ढगांमुळे रात्रीचे तापमान १.३ अंश सेल्सिअसने वाढून १५.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. सरासरीपेक्षा एक अंश अधिक असल्याने थंडी थोडी कमी झाली आहे.
हवामान विभागानुसार शनिवारी आकाशातील ढग काही प्रमाणात निघून जातील. उन-सावलीचा खेळ मात्र सुरूच राहील. २१ जानेवारी रोजी पावसाची शक्यताही दिसून येते. या दिवशी थोड्या-थोड्या अंतराने पाऊस पडू शकतो.
शुक्रवारी विदर्भात बुलडाणा ११.४ अंश सेल्सिअससह सर्वात थंड राहिले. याशिवाय अकोलामध्ये किमान तापमान १२.४, गोंदिया-वाशिममध्ये १३.६, अमरावती-ब्रह्मपुरीमध्ये १४, यवतमाळमध्ये १४.४,चंद्रपूरमध्ये १६.२ आणि गडचिरोलीमध्ये १६.४ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.