शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

नॅचरोपॅथी क्लिनिकच्या आड कुंटणखाना

By admin | Updated: April 8, 2016 02:58 IST

नॅचरोपॅथी क्लिनिकच्या आड चालणाऱ्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने गुरुवारी दुपारी धाड घातली.

चार वारांगना सापडल्या : सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाईनागपूर : नॅचरोपॅथी क्लिनिकच्या आड चालणाऱ्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने गुरुवारी दुपारी धाड घातली. येथे वेश्याव्यवसाय करताना पोलिसांना चार जणी सापडल्या. मात्र, त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणारी मेघना आणि तिचा दलाल (व्यवस्थापक) पळून गेला. रविनगर चौकातील एका इमारतीत भाड्याची सदनिका घेऊन मीनाक्षी ऊर्फ मेघना पंढरी खारकर (वय २८, रा. चंदननगर) हिने शतायू नॅचरोपॅथी क्लिनिक सुरू केले होते. प्रारंभी मसाजच्या नावाखाली येणाऱ्या ग्राहकांना देहविक्रय करणाऱ्या महिला-मुली उपलब्ध करून ती पैसे उकळत होती, नंतर तिने येथे कुंटणखानाच सुरू केला. मेघनासोबत आकाश नामक दलाल हा कुंटणखाना चालवीत होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला त्याची माहिती मिळाली.वरिष्ठ निरीक्षक पंडितराव सोनवणे यांच्या नेतृत्वातील पथकाने सापळा रचून गुरुवारी दुपारी बनावट ग्राहकाला आधी कुंटणखान्यावर पाठवले आणि त्याच्याकडून संकेत मिळताच तेथे धाड घातली. या कुंटणखान्यावर देहविक्रय करणाऱ्या चार जणी आढळल्या. त्या चौघीही विवाहित असून, पैशाच्या लोभाने वेश्याव्यवसाय करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पोलीस पोहोचणार अशी कुणकुण लागताच मेघना आणि आकाश पळून गेले. अंबाझरी ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, आर्थिक शाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर, सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक पी.सी. सोनवणे यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक सुनीता पाटील, योगेश चौधरी, हवालदार पांडुरंग निकुरे, योगेश घोडकी, गोपाल वैद्य, सुभाष खेडकर, नायक मनोज चव्हाण, अजय घाटोळ, शिपाई अनिता धुर्वे, छाया राऊत, सीमा बघेले, साधना चौव्हाण, अनिल दुबे, बळीराम रेवतकर आणि सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. रेखा बारहाते यांनी ही कामगिरी बजावली.(प्रतिनिधी)