गंगाजमुना बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:10 IST2021-08-22T04:10:34+5:302021-08-22T04:10:34+5:30

नागपूर : इतवारीच्या गंगाजमुना वस्तीतील वेश्याव्यवसाय ताबडताेब बंद करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांसह स्थानिक नगरसेवकांनी केली आहे. या व्यवसायामुळे ...

Close the Ganges | गंगाजमुना बंद करा

गंगाजमुना बंद करा

नागपूर : इतवारीच्या गंगाजमुना वस्तीतील वेश्याव्यवसाय ताबडताेब बंद करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांसह स्थानिक नगरसेवकांनी केली आहे. या व्यवसायामुळे परिसरात गुंडगिरी फाेफावली असून स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचा आराेप नगरसेवकांनी केला आहे.

नागरिकांनी लकडगंज पाेलीस स्टेशनच्या निरीक्षकांना वेश्याव्यवसाय बंद करण्याबाबत निवेदन सादर करीत आपल्या अडचणी मांडल्या. यानंतर प्रभाग क्र. २२ च्या नगरसेविका वंदना येंगटवार, नगरसेवक मनाेज चाफले, माजी नगरसेवक राजेश धकाते यांनी शनिवारी पत्रपरिषद घेत वस्तीमुळे हाेणारा त्रास व्यक्त केला. गंगाजमुना वस्तीत वेश्याव्यवसाय चालत असल्याने सातत्याने असामाजिक तत्त्वांचा वावर असताे. इतर राज्यातील अल्पवयीन मुलींना आणून त्यांच्याकडून देहव्यवसाय केला जाताे. परिसरात अवैध धंदे वाढीस लागले आहेत. त्यामुळे गुंडगिरी वाढली आहे. इतवारीचा परिसर शहरातील माेठी बाजारपेठ असून, हजाराे नागरिकांची दरराेज ये-जा असते. या नागरिकांना व व्यापाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागताे. शिवाय या परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम हाेत आहे. पाेलिसांनी सामान्य नागरिकांचा त्रास लक्षात घेता या अनधिकृत व्यवसायाला पायबंद घालावा, अशी मागणी या नगरसेवकांनी केली.

Web Title: Close the Ganges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.