अल्पवयीन विद्यार्थिनीशी शारिरीक संबंध करून बनविली क्लिप

By दयानंद पाईकराव | Updated: May 5, 2024 16:48 IST2024-05-05T16:47:45+5:302024-05-05T16:48:16+5:30

आरोपीस अटक : विद्यार्थिनीच्या आईलाही दिली मारण्याची धमकी

clip made of having physical relations with a minor student | अल्पवयीन विद्यार्थिनीशी शारिरीक संबंध करून बनविली क्लिप

अल्पवयीन विद्यार्थिनीशी शारिरीक संबंध करून बनविली क्लिप

दयानंद पाईकराव, नागपूर : अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी बळजबरी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. शारिरीक संबंधांची व्हिडीओ क्लिप तयार करून ती व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध करणाऱ्या आरोपीला जरीपटका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

शेख राशीद शेख आसिफ (२०, रा. ताजनगर टेकानाका पाचपावली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पेंटींगचे काम करतो. तर पिडीत अल्पवयीन विद्यार्थिनी १६ वर्षांची असून ती इयत्ता १२ वीला शिकते. आरोपी शेख राशीद अल्पवयीन विद्यार्थिनीच्या कॉलेज बाहेर उभा रहायचा. त्यातून त्यांची ओळख झाली आणि आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ््यात ओढले. त्यानंतर आरोपीने ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तिला आपल्या मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्याची व्हिडीओ क्लिप आरोपीने तयार केली. त्यानंतर तो व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अल्पवयीन विद्यार्थिनीचे शारिरीक शोषण करु लागला.

जवळपास आठ महिने आरोपीने तिचे शोषण केले. त्याचा या त्रासाला विद्यार्थिनी कंटाळली होती. त्यामुळे अल्पवयीन मुलीने त्याच्यासोबत बाहेर जाणे बंद करून आईला ही बाब सांगितली. परंतु आरोपीने अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन तिच्या आईला शिविगाळ करून मारण्याची धमकी दिली. अखेर अल्पवयीन मुलीच्या आईने जरीपटका ठाण्यात तक्रार दिली. जरीपटका ठाण्याचे उपनिरीक्षक शशिकांत तायडे यांनी आरोपी शेख राशीदविरुद्ध कलम ३७६ (ए), ५०४, ५०६, सहकलम ८, १२ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

Web Title: clip made of having physical relations with a minor student