मनपा मुख्यलयासमोर दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:28 IST2019-04-24T00:27:22+5:302019-04-24T00:28:15+5:30
सिव्हिल लाईन येथील महापालिका मुख्यालयाच्या गेटलगत ताक विकणाऱ्या ठेल्याजवळ मंगळवारी दुपारच्या सुमारास दोन गटात हाणामारीची घटना घडली.

मनपा मुख्यलयासमोर दोन गटात हाणामारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिव्हिल लाईन येथील महापालिका मुख्यालयाच्या गेटलगत ताक विकणाऱ्या ठेल्याजवळ मंगळवारी दुपारच्या सुमारास दोन गटात हाणामारीची घटना घडली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. येथे बघ्यांची गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच थोड्याच वेळात घटनास्थळी पोलीस पोहचल्याने अनर्थ टळला. हाणामारी नेमकी कशावरून झाली, याची माहिती मिळू शकली नाही. थंड ताक विक्रे त्यांचे येथे ठेले लावले जातात. यामुळे येथे दिवसभर लोकांची गर्दी असते. हाणामारीमुळे काही वेळ परिसरात दहशतीचे वातावरण होते.