स्थापत्या समितीची बैठक : बिल्डर्स असोसिएशनची नाराजी नागपूर : महापालिकेच्या नगर रचना विभागाचे धोरण आडमुठे आहे. बांधकामांची कोणतीच फाईल लवकर निकाली काढली जात नाही. या विभागात एक फाईल तब्बल ३० टेबर फिरते. यात वेळ जातो, असे सांगत बिल्डर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. लोकांची होणारी अडवणूक विचारात घेता नगररचना विभागाच्या कामकाजात पारदर्शकता व सुसूत्रता आणण्यात येईल, अशी ग्वाही महापालिकेच्या स्थापत्य विद्युत व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संदीप जोशी यांनी शुक्र्र वारी बैठकीत दिली. क्रेडाईचे अध्यक्ष प्रशांत सरोदे यांनी बैठकीत आॅटो डी.सी.आर. प्रणालीवर प्रश्नचिन्ह लावले. प्रणाली अमलात आणताना आॅनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. परंतु आॅटो डी.सी.आर.स्क्रुटिनीसह मॅन्युअल स्क्रु टिनी विभागाच्या इंजिनिअर्स मार्फत करण्यात येते. त्यामुळे वेळेचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आणले. यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. यातून लोकांची सुटका करण्यासाठी सक्षम अशी आॅटो डी.सी.आर. सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करा. यात कुणालाही छेडछाड करता येणार नाही, अशी व्यवस्था करण्याची सूचना केली. यात लॉगींग सिस्टीम असावी. विकास नियंत्रण नियमावलीचे पालन व्हावे. या बाबतच्या तक्र ारींचे निराकरण करून त्या तातडीने निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी करण्यात आली. समितीच्या उपसभापती सारिका नांदूरकर, सदस्य सुरेश जग्यासी, असलम खान, महेंद्र बोरकर, भावना लोणारे, वर्षा ठाकरे, सुलोचना कोहळे, नगररचना विभागाचे सहायक संचालक सतीश रेंगे, उपविभागीय अभियंता महेश गुप्ता, अनिल पवार, शशिकांत गोसावी, राजेंद्र लोंढे यांच्यासह सहायक आयुक्त व उपअभियंता आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नगररचनेत ३० टेबलवर फाईल फिरते
By admin | Updated: July 20, 2014 01:24 IST