शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

शहर व जिल्हाध्यक्ष करतील लोकसभा उमेदवाराची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 9:41 PM

काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार ठरविताना आता शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे मत विचारात घेतले जाणार आहे. प्रदेश काँग्रेसने यासाठी जिल्हा निवड मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले असून या मंडळाचे अध्यक्षपद शहर व जिल्हाध्यक्षांकडे सोपविण्यात आले आहे. संबंधित अध्यक्षांना आपल्या शिफारशीसह संभाव्य उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे सादर करायचा आहे.

ठळक मुद्देप्रदेश काँग्रेसकडे देतील अहवाल : निवड मंडळाचे अध्यक्षपद सोपविले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार ठरविताना आता शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे मत विचारात घेतले जाणार आहे. प्रदेश काँग्रेसने यासाठी जिल्हा निवड मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले असून या मंडळाचे अध्यक्षपद शहर व जिल्हाध्यक्षांकडे सोपविण्यात आले आहे. संबंधित अध्यक्षांना आपल्या शिफारशीसह संभाव्य उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे सादर करायचा आहे.ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नागपूर शहर काँग्रेस समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत लोकसभेचा उमेदवार दिल्लीहून ठरविताना स्थानिक काँग्रेस कमिटीचे मत विचारात घ्यावे, असा प्रस्ताव शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी ठेवला होता. संबंधित प्रस्ताव एकमताने पारित करून प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आला होता. आता प्रदेश काँग्रेसने संबंधित मागणी मान्य करीत शहर व जिल्हा काँग्रेस समित्यांना विश्वासात घेण्याची तयारी दर्शविली आहे.लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी शहर किंवा जिल्हाध्यक्षांनी निवड मंडळाची बैठक बोलवायची आहे. संबंधित बैठकीत चर्चा करून शहर किंवा जिल्हाध्यक्षांनी आपल्या शिफारशीसह संभाव्य उमेदवाराचे नाव प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या नमुन्यात भरून पाठवायचे आहे. यामुळे आता उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत अध्यक्षांना महत्त्त्व प्राप्त झाले आहे.शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ही प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर काम करणारी पक्षाची यंत्रणा आहे. लोकसभा उमेदवार निवडीत या यंत्रणेला विश्वासात घेण्याचा प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी घेतलेला निर्णय पक्षासाठी वेळ देणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारा आहे. विकास ठाकरे,शहर अध्यक्ष,नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक