शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनीच स्वीकारावी 'सायकल' केंद्रित जीवनशैली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 21:45 IST

प्रदूषण कमी करण्यासाठी ‘मोटरलेस व्हेईकल’ संकल्पना म्हणजे पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचा कमीत कमी वापर होईल अशी जीवनशैली स्वीकारावी लागेल आणि त्यासाठी सायकल हा सर्वोत्तम पर्याय आहे.

ठळक मुद्दे ‘सायकल ट्रॅक’ संकल्पना सत्यात यावीफिटनेस व प्रदूषणमुक्तीचाही मंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये नागपूर शहर चौथ्या क्रमांकावर आहे आणि यात वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषण‘चा वाटा १७.२ टक्के एवढा आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी ‘मोटरलेस व्हेईकल’ संकल्पना म्हणजे पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचा कमीत कमी वापर होईल अशी जीवनशैली स्वीकारावी लागेल आणि त्यासाठी सायकल हा सर्वोत्तम पर्याय आहे. ही केवळ प्रदूषण कमी करण्यासाठी नाही तर फिटनेससाठीही महत्त्वाची आहे, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक राहुल सावंत यांनी दिली.

जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून राजधानी दिल्लीची ओळख होती पण ती आता पुसली जात आहे. लॉकडाऊन राजधानीसाठी लाभदायक ठरला. मात्र एवढ्यावरच न थांबता आता दिल्लीमध्ये ‘सायकल मेयर’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. किमान शनिवार व रविवारी मोटर वाहनाऐवजी केवळ सायकल वापरण्याचा निर्धार लोकांनी केला आहे. ही संकल्पना नागपूर शहरानेही स्वीकारण्याची गरज आहे. राहुल सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या मेट्रो रेल्वेच्या प्लॅनमध्ये ‘डेडिकेटेड सायकल ट्रॅक व पार्किंग’ या संकल्पनेचा समावेश आहे. त्यानुसार प्रत्येक स्टेशनवर सायकल पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र लोकांचा प्रतिसाद नसल्याने सायकल ट्रॅकचे नियोजन फिस्कटले आहे.विशेष म्हणजे नवी मुंबई व खारघर येथे सायकल ट्रॅकची संकल्पना राबविली आहे आणि सायनसह इतर भागात ती प्रस्तावित आहे. मग नागपूरला का नाही, हा प्रश्न आहे. त्यामुळे नागपूरकर सायकल वापराबाबत जागरूक नाहीत, असा अर्थ निघतो. थोड्या थोड्या अंतरावरही पायी किंवा सायकलचा उपयोग न करता ‘मोटर’ वाहन काढले जाते. यामुळे प्रदूषणाचा स्तरही वाढला आहे. विशेष म्हणजे शहराच्या ‘शुद्ध हवा नियोजनात’ ‘डेडिकेटेड सायकल ट्रॅक’चा समावेश आहे. महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मनपाच्या कृती समितीला तो मूर्तरूपात आणायचा आहे. मात्र त्यांच्याकडून ते होणार याबाबत शंका आहे पण नागरिकांनी ठरवले आणि मागणी केली तरच ते शक्य होऊ शकेल. मात्र ‘सायकल केंद्रित’ जीवनशैलीसाठी लोकांनी आग्रही असले पाहिजे, हे महत्वाचे आहे.वातावरणातील प्रदूषण काढणे शक्य नाही. पावसाने ते जमिनीवर बसेल पण त्यातून माती व जलप्रदूषण होईल. मात्र गाड्यांचा वापर कमी करून प्रदूषण उत्सर्जन कमी करणे आपल्या हाती आहे. त्यासाठी कमी अंतरासाठी सायकलीचा उपयोग हा सर्वोत्तम पर्याय आहे. यातून प्रदूषण कमी करण्यास मदत होईल व आरोग्यही सुदृढ राहील.- राहुल सावंत, वातावरण फाउंडेशन

 

 

टॅग्स :Cyclingसायकलिंग