दूषित पाण्यामुळे निराला सोसायटी येथील नागरिक त्रस्त ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:20+5:302021-04-09T04:08:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नेहरूनगर झोनमधील प्रभाग ३० मधील निराला सोसायटी, ताजबाग परिसरात मागील काही महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा ...

दूषित पाण्यामुळे निराला सोसायटी येथील नागरिक त्रस्त ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नेहरूनगर झोनमधील प्रभाग ३० मधील निराला सोसायटी, ताजबाग परिसरात मागील काही महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने या भागातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ताजबाग परिसरातील आलेमा मदरसा व टेकडा रोड येथील पाण्याची लाईन लिकेज असल्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात मागील चार महिन्यापासून परिसरातील नागरिक झोन कार्यालयाकडे तक्रारी करीत आहेत. परंतु प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही.
ओसीडब्ल्यूने नवीन पाईपलाईन टाकली आहे. परंतु अद्याप चार्ज केली नसल्याने दूषित पाण्याची समस्या कायम आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी झोनचे सहायक आयुक्त व ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. दूषित पाण्याची समस्या तातडीने निकाली काढण्याची मागणी केली. शिष्टमंडळात याकूब खान, शरीफ अहमद, अलीम शेख, शेख फहीम, अजीज शेख, सय्यद यासीन आदींचा समावेश होेेता.