शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मनमानीपणे सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याचा नागरिकांना अधिकार नाही; न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 18:51 IST

Nagpur : सरकारी कार्यालयांत जायचे असल्यास नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांना मनमानीपणे सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याचा आणि अधिकाऱ्यांना भेटण्याचा हक्क नाही. सरकारी कार्यालयांत जायचे असल्यास नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. 

न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांनी हा निर्णय दिला. बेकायदेशीर व मनमानी वागणुकीमुळे नागपूर येथील किशोर चकोले यांना वेकोलिने अवांछित व्यक्ती घोषित करून मुख्यालयासह इतर सर्व आस्थापनांमध्ये प्रवेश करण्यास तीन वर्षाकरिता प्रतिबंधित केले आहे. यासंदर्भात ७ ऑक्टोबर २०२४ रोजी आदेश जारी उच्च करण्यात आला आहे. त्याविरुद्ध चकोले यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. चकोले यांच्यावरील गैरवर्तनाचे गंभीर आरोप लक्षात घेता वरील निरीक्षण नोंदवून ही याचिका फेटाळून लावली.

अशी आहेत न्यायालयाची इतर निरीक्षणे

  • चकोले यांचा वकोलि अधिकाऱ्यांना भेटण्याचा उद्देश प्रामाणिक नसतो. ते अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी खोट्या तक्रारी दाखल करतात. अशा तक्रारींमुळे सरकारी कर्मचाऱ्यांवरील ताण वाढतो.
  • चकोले नियमांचे पालन करीत नाहीत. ते कामाच्या तासांमध्ये अधिकाऱ्यांकडे जातात. त्यांच्या कामात अडथळे निर्माण करतात. ते अधिकाऱ्यांना अशाप्रकारे मनस्ताप देऊ शकत नाही.
  • चकोले यांना तक्रार करण्याचा अधिकार आहे. परंतु, यासाठी त्यांना वेकोलि कार्यालयात जाण्याची गरज नाही. ते ऑनलाइन प्रणालीचा उपयोग करू शकतात.
English
हिंदी सारांश
Web Title : No Unfettered Right to Visit Government Offices, Rules High Court.

Web Summary : Citizens can't arbitrarily visit government offices; rules must be followed, the Nagpur High Court stated. The court upheld restrictions on an individual repeatedly harassing WCL officials with false complaints, noting alternative online complaint mechanisms exist. Such actions burdened government employees and disrupted work.
टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालयGovernmentसरकार