समाजकंटकांचा नागरिकांवर हल्ला

By Admin | Updated: November 6, 2016 16:22 IST2016-11-06T16:22:01+5:302016-11-06T16:22:01+5:30

तुकडोजीनगरातील हनुमाननगर क्रीडा मैदानावर उपद्रव करणाºयांना हटकले म्हणून समाजकंटकांनी ज्येष्ठ नागरिकांवर दगड विटांनी हल्ला चढवला.

Citizens Attack | समाजकंटकांचा नागरिकांवर हल्ला

समाजकंटकांचा नागरिकांवर हल्ला

>ऑनलाइन लोकमत 
नागपूर, दि. 6 -  तुकडोजीनगरातील हनुमाननगर क्रीडा मैदानावर उपद्रव करणाºयांना हटकले म्हणून समाजकंटकांनी ज्येष्ठ नागरिकांवर दगड विटांनी हल्ला चढवला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने हुडकेश्वर पोलीस ठाण्यावर धडक देऊन समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. 
सूत्रांच्या माहितीनुसार, या मैदानात १० ते १५ जणांचे टोळके नेहमीच गैरप्रकार करत बसलेले असते. नेहमीप्रमाणे ते उपद्रव करताना दिसल्यामुळे शनिवारी रात्री ८ च्या सुमारास ज्येष्ठ नागरिक विजय बानाईत यांनी त्यांना हटकले. त्यामुळे समाजकंटकांनी बानाईत यांच्यावर हल्ला चढवून त्यांना जबर जखमी केले. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. संतप्त जमाव हुडकेश्वर ठाण्यावर पोहचला. त्यांनी समाजकंटकाकडून होणारा त्रास सांगितला. मुलांना खेळण्यापासून रोखले जाते. महिला-मुलींनाही त्रास दिला जातो. महापालिकेचे गार्ड येथे उपद्रवी तरुणांना दारू पीत दिसूनही विरोध करीत नाही, असे सांगितले. पोलिसांनी मैदानाकडे धाव घेतली. मात्र, अद्यापपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

Web Title: Citizens Attack