शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

न झालेल्या अपहरणामुळे सिनेस्टाईल गोंधळ; शहर पोलिस यंत्रणेची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:00 IST

Nagpur : पतीच्या छळाला कंटाळून महिलेने कारने गाठले नागपूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्तीसगडमधील डोंगरगड येथून एका पाच वर्षीय मुलीचे कारने अपहरण झाल्याची सूचना आल्यामुळे नागपूर पोलिस अलर्टवर आले व विविध ठिकाणी नाकाबंदी लावत युद्धपातळीवर शोध सुरू झाला. पोलिसांनी नेटवर्कचा वापर करत सक्करदऱ्यातून संबंधित कारला ताब्यातदेखील घेतले. मात्र, कारमध्ये चालकासोबत एक महिला आढळून आली व ज्या मुलीच्या अपहरणावरून तारांबळ उडाली होती ती तिचीच मुलगी असल्याची माहिती समोर आली. आश्चर्याची बाब म्हणजे ती मुलगी छत्तीसगडमध्येच आजीकडे सुखरूप होती. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा हा प्रसंग मंगळवारी नागपुरात घडला व न झालेल्या अपहरणामुळे पोलिस यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. 

१३ मे दुपारी एक वाजता नागपूर पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळाली होती. अपहरणकर्ते डोंगरगडमधील पाच वर्षीय मुलीला पांढऱ्या रंगाच्या कारमधून घेऊन निघाले असून त्यांनी देवरी सीमेवरील बॅरिकेट्स उडविले असल्याचे सांगण्यात आले. सीजी-०४ सिरीजची कार असल्याने पोलिसांनी नाकाबंदी लावली. सहायक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांना ती कार नंदनवन, सक्करदरा परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. 

पोलिसांनी गाडी अडविली व त्यात एक चालक व ३१ वर्षे वयाची महिला होती. तिला मुलीबाबत विचारणा केली असता तिने तिलाच ११ व पाच वर्षांच्या दोन मुली असल्याचे सांगितले. महिलेचे १३ वर्षांअगोदर नागपुरात मोबाइल रिपेअरिंग करणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न झाले होते. मात्र, पतीशी पटत नसल्याने ती महिन्याभराअगोदर मुलींना घेऊन डोंगरगड येथे माहेरी निघून गेली होती. मात्र, माहेरीदेखील पटत नसल्याने तिने नागपुरातील एका परिचित चालकाला फोन करून डोंगरगडला बोलविले व तेथील लोकांची नजर चुकवून नागपूरकडे निघाली. माहेरच्या लोकांना ती दिसली असता त्यांनी दुसऱ्या कारने तिचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे देवरी सीमेवर बॅरिकेट्स तोडून कार समोर निघाली. तिने तिच्या दोन्ही मुली डोंगरगडला आजीकडेच असल्याचे स्पष्ट केले. हिवरे यांनी डोंगरगड येथील पोलिस निरीक्षकांना विचारणा केली असता मुली आजीकडेच असल्याची खात्री झाली. डोंगरगडमध्ये कुठल्याही अपहरणाची नोंद नव्हती. महिलेच्या नातेवाइकांनी देवरी सीमेवर अपहरणाचा कांगावा केला होता व त्यातून हा सगळा गोंधळ निर्माण झाला. हा खरा प्रकार समोर आल्यावर नागपुरातील पोलिस यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला. सहायक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्यासोबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद ठाकरे, प्रवीण वाकळे, शेरकर यांच्या पथकाने त्या कारचा शोध घेतला. 

टॅग्स :nagpurनागपूरKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी