चित्रपटगृहांना नाही मिळाली हिरवी झेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 00:19 IST2020-10-15T00:16:37+5:302020-10-15T00:19:16+5:30
Cinema Theater, Nagpur News कोरोना महामारीमुळे गेल्या सात महिन्यांपासून चित्रपटगृह बंद असल्याने मालक व संचालक चिंतेत आहेत. अनलॉकच्या काही टप्प्यानंतर चित्रपटगृह सुरू होण्याची त्यांना अपेक्षा होती, पण असे झाले नाही. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने कोरोनानंतर लावण्यात आलेली काही बंधने शिथिल करण्यात आली, पण त्यात चित्रपटगृह सुरू होण्याचा समावेश नाही.

चित्रपटगृहांना नाही मिळाली हिरवी झेंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना महामारीमुळे गेल्या सात महिन्यांपासून चित्रपटगृह बंद असल्याने मालक व संचालक चिंतेत आहेत. अनलॉकच्या काही टप्प्यानंतर चित्रपटगृह सुरू होण्याची त्यांना अपेक्षा होती, पण असे झाले नाही. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने कोरोनानंतर लावण्यात आलेली काही बंधने शिथिल करण्यात आली, पण त्यात चित्रपटगृह सुरू होण्याचा समावेश नाही.
चित्रपटगृह मालकांसमोर सध्या दुहेरी समस्या आहे. या जागेवर पूर्णपणे व्यवसाय बदलता येणार नाही, असा नियम आहे. चित्रपटगृहाच्या जागेवर जर दुसरा व्यवसाय करायचा असेल तर एक तृतीयांश जागेवर लहान चित्रपटगृह बनवावे लागते. अर्थात चित्रपटगृह एक हजार सिटांचे असेल तर लहान चित्रपटगृह २५० सिटांचे बनवावे लागते. सध्या स्थितीत संसर्ग टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना एक सीट सोडून प्रेक्षकांना बसवावे लागेल. त्यामुळे मालकांना शुल्क कमी मिळेल. सध्या नागपुरात कोणत्याही चित्रपटगृह मालकातर्फे व्यवसाय बदलण्याची कोणतीही सूचना नाही. ते सध्या मोठ्या पडद्याला उघडण्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.
औद्योगिक दर्जासाठी आवेदन
चित्रपटगृहांना औद्योगिक दर्जा देण्याच्या हेतूने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगामध्ये (एमएसएमई) सामील करण्यात येणार आहे. त्यांची नोंदणी मिळाल्यानंतरच चित्रपटगृहांचे मालक एमईआरसीमध्ये आवेदन करीत आहेत. त्यामुळे चित्रपटगृहांचे संचालन करताना आता त्यांना व्यावसायिक नव्हे तर औद्योगिक दरात वीज उपलब्ध होईल.
प्रमोद मुनोत, कार्यकारी सदस्य, सेंट्रल सर्किट सिने असोसिएशन.