वर चॉकलेट, खाली एमडी; ड्रग्ज माफियांचे नवे तंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 11:57 AM2020-12-01T11:57:40+5:302020-12-01T11:58:01+5:30

Nagpur News crime तपास यंत्रणांची नजर चुकविण्यासाठी ड्रग्ज माफियांनी ड्रग्ज तस्करीचे नवे तंत्र विकसित केले आहे. त्यानुसार चॉकलेट बॉक्स, मेडिसीन बॉक्स आणि गिफ्ट बॉक्सचा ड्रग्ज माफियांकडून बेमालूमपणे वापर केला जात आहे.

Chocolate on top, MD below; New techniques of drug mafia | वर चॉकलेट, खाली एमडी; ड्रग्ज माफियांचे नवे तंत्र

वर चॉकलेट, खाली एमडी; ड्रग्ज माफियांचे नवे तंत्र

Next
ठळक मुद्देगिफ्ट बॉक्स, मेडिसीन बॉक्सचा वापर 


नरेश डोंगरे 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तपास यंत्रणांची नजर चुकविण्यासाठी ड्रग्ज माफियांनी ड्रग्ज तस्करीचे नवे तंत्र विकसित केले आहे. त्यानुसार चॉकलेट बॉक्स, मेडिसीन बॉक्स आणि गिफ्ट बॉक्सचा ड्रग्ज माफियांकडून बेमालूमपणे वापर केला जात आहे. गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने केलेल्या कारवाईतून ड्रग्ज माफियांच्या या अजब शक्कलीचा उलगडा झाला आहे.

नायजेरियन तसेच विदेशी तस्करांच्या माध्यमातून मुंबईत वेगवेगळ्या अमली पदार्थांची नियमित मोठी खेप येत असते. ती नंतर मुंबईतून विविध राज्यात पोहोचविली जाते.

विशेष म्हणजे, महाग असूनही विविध अमली पदार्थांमध्ये सध्या एमडी (मेफेड्रोन)चा नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तीन हजारांपासून एमडीची पुडी विकत मिळते. नशा करणाऱ्याला काही वेळेसाठी एका वेगळ्या विश्वात असल्याची अनुभूती देणारे तरंग उठतात. तो अनुभव घेण्यासाठी नशेडी एमडी सप्लायर आणि पेडलर्सकडे घिरट्या घालतात. नागपुरात एमडीची मागणी आणि विक्री करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात एमडी आणली आणि विकली जाते. गेल्या काही महिन्यात गुन्हे शाखेच्या पथकाने एमडी तस्करांवर कारवाईचा धडाका लावल्यामुळे ड्रग्ज माफियांनी एमडी पोचण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. त्यानुसार आता एमडी पावडर गिफ्ट बॉक्स, मेडिसीन बॉक्स किंवा उच्च किमतीच्या चॉकलेट बॉक्समधून पाठवले जाते. त्यासाठी कुरिअरचा वापर केला जातो. शनिवारी आणि रविवारी स्थानिक एनडीपीएस पथकाने मुंबईहून नागपुरात आलेल्या ट्रॅव्हल्स बसमधून कुरिअरच्या माध्यमाने चौदा ते पंधरा लाखांचे एमडी पावडर जप्त केले. गिफ्ट बॉक्समध्ये एमडीच्या पॅकेटच्या वर महागडे चॉकलेट ठेवलेले होते. चॉकलेटच्या खाली आवरण आणि नंतर एमडीचे पॅकेट ठेवून होते. टिप पक्की असल्याने पोलिसांना फारशी कसरत करावी लागली नाही.

पन्नास रुपयात पाच लाखाची एमडी

आतापर्यंत नागपुरातील एमडी तस्कर मुंबईत जाऊन किंवा मुंबईतील तस्करांच्या माणसाच्या हाताने इथे बोलवून घेत होते. मात्र पोलिसांकडून पकडले जाण्याचा धोका वाढल्यामुळे तस्करांनी आता गिफ्ट बॉक्समधून कुरिअरच्या माध्यमाने एमडीची तस्करी करणे सुरू केले. कुरिअर कंपनीला पन्नास रुपये देऊन ट्रॅव्हल्समधून मुंबईतून नागपुरात एमडीची खेप पाठवली जाते. शनिवारी सुमारे १० लाखांची तर रविवारी साडेपाच लाखांची एमडी अशाच प्रकारे नागपुरात पोचली.

पोहोचवणाऱ्या- उचलणाऱ्याला मिळतात हजारो रुपये

ड्रग्ज माफियाकडून कुरिअरच्या ऑफिसपर्यंत एमडीचे पाकीट पोहोचवणाऱ्याला तीन ते चार हजार रुपये तर संबंधित शहरात कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून तो बॉक्स उचलून ड्रग्ज सप्लायरच्या हातात पोहोचवून देणाऱ्याला तीन ते पाच हजार रुपये मिळतात, असे सांगितले जाते.

 

Web Title: Chocolate on top, MD below; New techniques of drug mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.