शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

चिरंजीव प्रसाद सांभाळणार नागपूर परीक्षेत्राची जबाबदारी; कोळसा तस्करी अन् अवैध दारू विक्रीचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 21:00 IST

सोमवारी सांभाळणार पदभार

 नागपूर: जातीय दंगलीने होरपळून निघू पाहणाऱ्या औरंगाबाद शहराला शांतताप्रिय शहर अशी ओळख देण्याचे उल्लेखनीय कार्य करणारे औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसादनागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त झाले आहेत. राज्य सरकारने आज आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. त्यातून येथील महानिरिक्षक के. एम. प्रसन्ना यांची औरंगाबादला तर औरंगाबादचे आयुक्त प्रसाद यांची नागपूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली. सन १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले चिरंजीव प्रसाद २०१८ पासून औरंगाबाद मध्ये पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

जानेवारी  ते मे २०१८ या  कालावधीत भीमा कोरेगांवमुळे औरंगाबाद येथे झालेली दंगल तसेच ११ मे च्या रात्री जुन्या शहरात झालेल्या जातीय दंगलीमुळे शहर होरपळून निघाले होते. या परिस्थितीत पोलीस आयुक्तपदी चिरंजीव प्रसाद रुजू  झाले होते. त्यांनी कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून विविध भागात जाऊन परिस्थिती जाणून घेतली. बेरोजगार तरुण आणि महिलाना रोजगारभिमुख प्रशिक्षण देउन रोजगार मिळवून देण्याचा एक हाती  कार्यक्रम राबविला. यातून नागरिकांचा विश्वास जिंकण्यात त्यांनी यश मिळवले. तसेच पोलीस आणि जनतेतील अविश्वासाची दरी कमी करण्याचीही कामगिरी बजावली. यानंतर छोट्या मोठ्या घटनेचे रूपांतर दंगलीत होणार  नाही, याची काळजी घेतली. यातून  औरंगाबादला शांतताप्रिय शहर म्हणून ओळख मिळवून देण्यात  प्रसाद यशस्वी ठरले. आता ते नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

या क्षेत्रात नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि वर्धा हे चार जिल्हे येतात. त्यातील चंद्रपूर आणि वर्धा हे दोन जिल्हे दारूबंदीचे जिल्हे म्हणून परिचित असले तरी या दोन्ही जिल्ह्यात देशी-विदेशी गावठी आणि बनावट विलायती दारू विकली जाते शिवाय चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा तस्करीचा ही मोठा गोरख धंदा आहे. या गोरख धंद्याला आळा घालण्याची जबाबदारी प्रसाद यांच्यावर आहे. आपण दोन-तीन दिवसात नागपुरात आपल्या पदाची सूत्रे स्वीकारू, असे त्यांनी लोकमत'शी चर्चा करताना सांगितले. परीक्षेत्राचा आढावा घेतल्यानंतर प्राधान्याने काय करायचे, ते आपण ठरवू , असेही ते म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरChiranjiv Prasadचिरंजीव प्रसादMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार